Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याने कधी रांगडे कधी मखमली व्हावे.. चाखत गोडी

आयुष्याने कधी रांगडे कधी मखमली व्हावे..
चाखत गोडी संसाराची स्वप्नांसोबत गावे..
विभ्रम थोडे थोडी गंमत थोडी छेडाछेडी
प्रेमालाही रंगत येते सोबत असता खोडी..

नको सारखी गुळमट गोडी हवाच थोडा झटका 
रंगत येते संसाराला उडता थोडा खटका
रंग बिलोरी आयुष्याचे समजून घ्यावे थोडे.
भाव मनीचे जाणुन घ्यावे सुटेल अवघड कोडे.

संसाराचे रूप खुलवते विरह भावना थोडी.
लुटूपुटीचे हवेच भांडण लटकी लाडीगोडी.
झणझणीत कधी, कधी गोड तर कधी लागते स्टार्टर..
मिळमिळीतशा जगण्यालाही हवी वाटते क्वॉर्टर..

लुटूपुटीच्या संसाराला हवी माणसे थोडी..
थोडी नटखट, चविष्ट आंबट, थोडी साखर गोडी.
खट्याळ काही, अतरंगी अन् काही कडवट थोडी
गहिवरल्या डोळ्यात पाझरे चांदणमाया वेडी.  

आयुष्याच्या वाटेवरती सुख दुःखाची सोबत.
आपुलकीच्या नात्यांसोबत आयुष्याला रंगत.
सखेसोबती, सगेसोयरे हळव्या गाठी भेटी.
आनंदाने ओंजळ भरती काळजातली नाती.

©Archana Pol काळजातली नाती
#HEARTSBOKEH
आयुष्याने कधी रांगडे कधी मखमली व्हावे..
चाखत गोडी संसाराची स्वप्नांसोबत गावे..
विभ्रम थोडे थोडी गंमत थोडी छेडाछेडी
प्रेमालाही रंगत येते सोबत असता खोडी..

नको सारखी गुळमट गोडी हवाच थोडा झटका 
रंगत येते संसाराला उडता थोडा खटका
रंग बिलोरी आयुष्याचे समजून घ्यावे थोडे.
भाव मनीचे जाणुन घ्यावे सुटेल अवघड कोडे.

संसाराचे रूप खुलवते विरह भावना थोडी.
लुटूपुटीचे हवेच भांडण लटकी लाडीगोडी.
झणझणीत कधी, कधी गोड तर कधी लागते स्टार्टर..
मिळमिळीतशा जगण्यालाही हवी वाटते क्वॉर्टर..

लुटूपुटीच्या संसाराला हवी माणसे थोडी..
थोडी नटखट, चविष्ट आंबट, थोडी साखर गोडी.
खट्याळ काही, अतरंगी अन् काही कडवट थोडी
गहिवरल्या डोळ्यात पाझरे चांदणमाया वेडी.  

आयुष्याच्या वाटेवरती सुख दुःखाची सोबत.
आपुलकीच्या नात्यांसोबत आयुष्याला रंगत.
सखेसोबती, सगेसोयरे हळव्या गाठी भेटी.
आनंदाने ओंजळ भरती काळजातली नाती.

©Archana Pol काळजातली नाती
#HEARTSBOKEH
archanapol5687

Archana Pol

New Creator