Nojoto: Largest Storytelling Platform

खरे काय खोटे !.... कुणाला कशाचा कुठे ताल आहे ? हव

खरे काय खोटे !....

कुणाला कशाचा कुठे ताल आहे ?
हवा ही कुणाची तसी चाल आहे !

जरी लोक म्हणती त्रिकोणी धरा ही
खरे माणतो, ती कुठे गोल आहे !

खरे काय खोटे पहातो न आता
मला फायद्याचे इथे मोल आहे !

जिथे स्वार्थ आहे तिथे लाळ घोटू
तणाला जसी बेरकी खाल आहे !

चहाडी लबाडी असे रोज माझी
मनी संयमाचा कुठे तोल आहे !

जळी पाय माझे असू द्या जरासे
जमानाच सगळा तळी खोल आहे !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता.पुसद जि.यवतमाळ

©Satish Deshmukh खरे 

#realization
खरे काय खोटे !....

कुणाला कशाचा कुठे ताल आहे ?
हवा ही कुणाची तसी चाल आहे !

जरी लोक म्हणती त्रिकोणी धरा ही
खरे माणतो, ती कुठे गोल आहे !

खरे काय खोटे पहातो न आता
मला फायद्याचे इथे मोल आहे !

जिथे स्वार्थ आहे तिथे लाळ घोटू
तणाला जसी बेरकी खाल आहे !

चहाडी लबाडी असे रोज माझी
मनी संयमाचा कुठे तोल आहे !

जळी पाय माझे असू द्या जरासे
जमानाच सगळा तळी खोल आहे !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता.पुसद जि.यवतमाळ

©Satish Deshmukh खरे 

#realization