Nojoto: Largest Storytelling Platform
satishdeshmukh3940
  • 30Stories
  • 6Followers
  • 86Love
    0Views

Satish Deshmukh

  • Popular
  • Latest
  • Video
591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

खरे काय खोटे !....

कुणाला कशाचा कुठे ताल आहे ?
हवा ही कुणाची तसी चाल आहे !

जरी लोक म्हणती त्रिकोणी धरा ही
खरे माणतो, ती कुठे गोल आहे !

खरे काय खोटे पहातो न आता
मला फायद्याचे इथे मोल आहे !

जिथे स्वार्थ आहे तिथे लाळ घोटू
तणाला जसी बेरकी खाल आहे !

चहाडी लबाडी असे रोज माझी
मनी संयमाचा कुठे तोल आहे !

जळी पाय माझे असू द्या जरासे
जमानाच सगळा तळी खोल आहे !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता.पुसद जि.यवतमाळ

©Satish Deshmukh खरे 

#realization
591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

शर्करा

तुझ्या गोडव्याने उभारी मिळाली !
जरा हासता बेकरारी मिळाली !

उमटतात वलये तळ्यातील उदकी
खळी गोड गाली खुमारी मिळाली !

तुझी चाल मजला अशी भावली की
उदासी मनाला भरारी मिळाली !

तुझे थोर माहेर मोठे घराणे
सखे तू मला फार भारी मिळाली !

किती गोडवा या प्रपंचात आला
सुखे जीवनी आज सारी मिळाली !

तपासून आलो उगी रक्त परवा
मला साखरेची बिमारी मिळाली !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता.पुसद 
जि.यवतमाळ

©Satish Deshmukh #Butterfly शर्करा
591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

गुलजार

वादात का पडावे, बेकार वेळ जातो !
आपल्याच भावनांचा, बाजार होत जातो !

फास्यात दूर्जनाच्या, फसणार मी न आता !
शब्दास शब्द जाता, तलवार होत जातो !

आभार मानतो की, जे कोसती मनाला !
निंदेत मी तयांच्या, कलदार होत जातो !

वैरी म्हणूनी आपण, कोणास का पहावे !
द्वेशात मत्सराचा, आजार होत जातो !

पाहून हास गाली, कामावरून आलो !
सखये तुझ्या अदांनी अलवार होत जातो !

ऐसी अजोड गाणी, काही तरी लिहावे !
छंदास वेळ देता, गुलजार होत जातो !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,ता.पुसद जि.यवतमाळ

©Satish Deshmukh गुलजार 

#Journey
591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

बैलजोडी

तळपत्या उन्हात या, वखर पाळी कोण करतो ?
भेगाळली जमिन ही, मऊ काळी कोण करतो ?

लाख येवो यंत्र जगती, बैलजोडी मस्त आहे !
तडकल्या रानास या, पुरणपोळी कोण करतो ?

पोसतो जगास साऱ्या, सोबतीला बैलजोडी !
खळ्यावर शेवटी, रास पिवळी कोण करतो ?

ढेकळाच्या चांदण्या अन् बैलजोडी चंद्र माझा !
ढेकळावर उजेडाची, लिखावटी कोण करतो ?

देव आहे, सण आहे, पूज सखे आज त्याला!
शंकराचा दूत आहे, अन्न पाणी तोच देतो !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,पुसद
जि यवतमाळ.

©Satish Deshmukh बैलजोडी 

#Shiva
591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

बळीराजा 

इथे जगरहाटी बघीतली मी आता !
खरी रत्न खोटी, बघीतली मी आता !

फसवितो जनासी बोलबाला तयांचा
ठगी लोक मोठी, बघीतली मी आता !

न माया न ममता न करुणा न काही
मनी दगडगोटी, बघीतली मी आता !

आहो मिडियाही सत्य लपवीत आहे
भडक सनसनाटी, बघीतली मी आता

शिक्षणाचा तर येथे बाजार केला
मुले कोरी पाटी, बघीतली मी आता !

सखा सोबतीचा दगेबाज झाला
डमी मित्र झूठी, बघीतली मी आता 

प्रामाणिक फक्त इथे बळीराजा
तयाची सचोटी बघीतली मी आता !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, पुसद

©Satish Deshmukh जगरहाटी 

#SunSet
591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

सुधारणा.....

लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एकांतलो मी पाहूनिया झूंड त्यांचे !
धाडसाला भित्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जूणे मित्रा म्हणाया लागले !



सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,पुसद

©Satish Deshmukh सुधारणा 
#IFPWriting
591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एकांतलो मी पाहूनिया झूंड त्यांचे
धाडसाला खत्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जूणे मित्रा म्हणाया लागले !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,ता.पसद

©Satish Deshmukh कुत्रा हा

कुत्रा हा #मराठीकविता

591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एंकातलो मी पाहुनिया झूंड त्यांचे
धाडसाला खत्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जुने मित्रा म्हणाया लागले !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री.

©Satish Deshmukh कुत्रा
591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

रुसवा....

सखे मी तुझ्याशी, कधी वाद केला !
असा का अबोला, अजीबात केला !

तळ्यातील कमळे, रुसावी जळाशी
गुलाबी फुलांनी, नवा साज केला !

प्रिये का असा राग नाकावरी गं ?
तुझा मी जरासा, न उपहास केला !

बहावा जसा मी, लतेसम जवळ ये
मला हाय अंतर, सखे जाच केला !

करत बैसतो मी, कवीता तुझ्यावर
जराशी पहा तर, नवा शेर केला !

समाधीत जातो, पुन्हा भंगतो मी
तुझ्या पैंजणांनी, उरी घात केला !


सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता.पुसद जि.यवतमाळ.

©Satish Deshmukh रुसवा 
#SunSet
591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

स्मिता ......

जीवन माझे तप्त मातीची धूप साजणी !
तुझे श्रावणी हिरवाईचे रुप साजणी !

सुतकी चेहरा माझा आणि तू तर स्मिता !
तुझे हासणे मला आवडते खूप साजणी !

माझी असते उगाच कुरबुर विणाकारणी
तू संगीतातला राग माधुरी भूप साजणी !

मी तर आहे भंपक ठेचा त्यात आळणी
साजूक तू तर वरणावरचे तुप साजणी !



सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,ता पुसद
जि.यवतमाळ

©Satish Deshmukh स्मिता 

#janmaashtami
loader
Home
Explore
Events
Notification
Profile