Nojoto: Largest Storytelling Platform

मालक चारा नको पाठीवर मायेची फक्त थाप द्या .. लागे

मालक चारा नको
 पाठीवर मायेची फक्त थाप द्या ..
लागेल गरज तेव्हा मात्र 
एक जोराची हाक द्या....

मालक पोटभर नको
 धडाला फक्त आसरा द्या ..
आयुष्यभर राब राब राबेल 
 तुमचा फक्त वारसा द्या...

मालक हिरवा नको 
वाळेल सुका कसाही द्या
मालक खाटीक नको 
बदल्यात चाकरी मात्र कसून घ्या.

मालक गोठा नको 
साधं छप्पर फक्त द्या ..
बैल नव्हे माणूस म्हणून 
मला कुटुंबात तेवढं घ्या.....

मालक गळफास नको 
उरात फक्त बळ द्या.. 
आत्महत्या नकोच नको 
सुवासिनीला सुखदुःखात 
फक्त तुमची साथ द्या. 
फक्त तुमची साथ द्या......

.

©गोरक्ष अशोक उंबरकर
  बैलपोळा