Nojoto: Largest Storytelling Platform

           या जगात आपलं प्रत्येकाशी काही ना काहीतर

           या जगात आपलं प्रत्येकाशी काही ना काहीतरी नात नक्की आहे . आपण ही नाती जपण्याचा खूप प्रयत्न करतो. काही वेळा काय होत , समोरचा बोलत नाही म्हणून आपण बोलत नाही . आपण आपल आपल मत ठरवून टाकतो . तो बोलत नाही मी का बोलू . त्याला नाही का वाटत बोलाव , तो बोलला तरच मी बोलेन . अशी एक ना अनेक विचार आपण आपल्या मनात आणून त्या व्यक्ती पासून दूर राहतो . पण आपण कधी हा विचार करतो का ....? 
की नक्की काय झालं असेल ....? 
का बोलत नसेल तो ....? 
त्याची तब्बेत तर ठीक असेल ना .....? 
त्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना ? 
त्याला आपली गरज असेल तर ? 
                     जर आपण कदाचित हा विचार केला तर भरपूर प्रश्न सुटतील अस मला वाटत . आपण जर समोरच्याला न बोलण्याच कारण विचारलच नाही तर ते आपल्याला कस समजणार . समजा तुम्ही तुमच्या अशा एका मित्राला विचारलं की  बाबा काय झाल . तु असा शांत का आहेस ? तु ठीक आहेस ना? काही प्रॉब्लेम आहे का ? 
       आणि  त्याने तुमच्याकडे एक नजर टाकून तुमच्या कुशीत येऊन ढसा ढसा रडायला सुरुवात केली . जे मनात आहे ते तुम्हाला सगळं काही सांगून टाकलं आणि तो तसाच तुमच्या कुशीत शांत झाला . या सगळ्या घडलेल्या काही मिनिटांच्या संवादात जितकं मोकळ तुमच्या मित्राला वाटतंय ना ... मी खात्रीने सांगू शकते तुम्हाला ही तितकंच मोकळ वाटेल . 

आजकाल कुठे कोणाला कोणासाठी वेळ आहे . जो तो उठतोय आपल्या कामाला जातोय . काहीवेळा तर आपल्याला हे सुद्धा माहित नसत की आज आपल्या घरातल्या सोफ्याची जागा  बदललेय किंवा आपल्या बायकोने , आईने ,बहिणीने आपल्यासाठी काहीतरी खास जेवण बनवलंय तर आपण त्यांचं दोन शब्दात कौतुक कराव . आपण आपल्या विश्वात खूप रमत चाललोय आणि आपल्याला कळत ही नाहीये की आपली नाती मागे पडत चाललेयत . शेवटी काय आपण कोणावर जबरदस्ती नाही करू शकत नाती टिकवण्यासाठी . 

    येणारे येतात , जाणारे जातात . ज्यांना थांबावं वाटत ते थांबतात . आपण एखाद्याला हट्ट करून थांबवू शकतो ,पण त्याला मनापासून थांबवण अशक्य . जस फुलाला घट्ट धरून ठेवल्यावर पाकळ्या कोमेजून जातात . तसेच आपल्या हट्टासाठी आपण पकडून ठेवलेली नाती पण कोमेजतात. 
त्यांना अलगद सोडा . निवांत फिरू दे , मोकळा श्वास घेऊ दे त्यांच्या आवडी नुसार . 
           मन भरल्यावर ते अलगद तुमच्या कुशीत येतील . त्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पहा तो क्षण दूर नाही . 

तुम्ही तुमच्या प्रत्येक नात्याला जितका जास्त वेळ द्याल तितका तुमच्यातील नात्यात गोडवा राहील .

©Shailee Rodrigues
  #Chess #Nojoto #Lekh #lekhak #writinggyan #Zindagi_Ka_Safar