सौंदर्याची निशाणी तु.. 💕 लुकलुक पाणीदार डोळे, नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख, काळेशार ते घनदाट केस जणू गर्द राईच एक... चाफेकळी टपोरे रूबाबदार नाक त्याला लटक्या रूसव्याची धाप.. लाल गोरे गाल,त्यावर पडते खळी कमाल... गुलाब पाकळी सम गोड गुलाबी ओठ, हस्य सदा त्यावर गोड,शब्दांत ते मांडाव तरी कसं थेट...? नयन नक्षी जणू जिवंत मुर्तीच तु गोंडस हणुवटी, त्याला सुंदर तीळाने करून सोबत झाली परिपूर्ण सौंदर्यवतीच तु... नाजुक मऊ मखमालीचे कापसा सम ते गोरे पान हात, सहज भिजताय छान सुबक मेंहदीच्या रंगात... सौंदर्य परी तु, सुंदरतेची निशाणी तु. जलबुट्टीवार वेलीदार कंबर,जणू हरिणीची ग त्याला चाल... मखमालीचे पाय नाजुक-नाजुक त्याला पैंजणाच्या छुनछुन घुंगरांचा ताल.... ! एक प्रेमवेडा/"शब्दवेडा" गणेश फापाळे...✍🏻 ©Ganesh Phapale सौंदर्याची निशाणी तु.. 💕 लुकलुक पाणीदार डोळे, नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख, काळेशार ते घनदाट केस जणू गर्द राईच एक...