*किती घेणार देवा परीक्षा माझी * थकलो नाही मी अजून,तू हसू नको पाहून माझ्याकडे, दिवस मावळला आज तरी,उद्या सूर्य उगवेल सर्विकडे. तू जरी घेत असशील परीक्षा माझी,तरी हार मी लवकर माननार नाही लढेल तुझ्यासोबत जो पर्यंत आहे जिवात माझ्या जीव येणार तुलापण एक दिवस माझ्यावर कीव... किती देशील रे दुःख मला ,आणखी किती बघणार माझी सहनशक्ती, झुकशील तू पण एक दिवस बघुन माझी भक्ती.. केले नाही वाईट कोणाचे मी आज पर्यंत, मग माझ्या मागे का लागला तू,देणार का मला त्रास असाच शेवटपर्यंत. जगू दे मला पण तू आनंदात,घेऊ दे आनंद थोडा आयुष्याचा माहिती नाही रे मला किती वेळ बाकी आहे माझ्या जीवनाचा. हसायचे आहे मला,खूप फिरायचे आहे माझे आयुष्य मला देवा, मनभरून जगायचे आहे... थोडी साथ दे तू मला फक्त,बाकी मेहनत मलाच करायची आहे.. आयुष्य एकदाच मिळते देवा, मलापण आनंदात जगायचे आहे.. ©Priyanka Jaiswal #किती घेणार देवा परीक्षा माझी