Nojoto: Largest Storytelling Platform

White कामगारा....ऊठ, तू लढला पाहिजे, विखारी नजरेला

White कामगारा....ऊठ,
तू लढला पाहिजे,
विखारी नजरेला भिडला पाहिजे..!

आज धर्मपुरी उद्या धाराशिव,
मग पुणे जालना परभणी,
असे किती दिवस मोजायचं..!
सवाल आहे कामगारा तुला
धडावर मेंदूला नुसतंच ठेवून
किती दिवस बघायचं..!

तुझी निब्बर चोच
नुसतीच वाळूच्या ढिगाऱ्यात खुपसू नको;
खुपस नराधमाच्या डोळ्यात.
गळून पडली पाहिजे त्याची मुजोरी,
झाला पाहिजे साक्षात्कार त्याला कृत्याचा.!

वार कर धडक नजरेतून,
तुझे शब्द शब्द गुंजू दे नभा नभात..!
तुझे बोल भेदले पाहिजे त्याच्या छातीला
कर नरसंहार अश्या प्रवृत्तीचा..!

ठेच,नागी विषारी आताच,
तमा नको विख छळेल थोडं...!
मिटली पाहिजे जमात विखारी
नको आता भीती नको कशाची..!

कामगारा..ऊठ,
तू लढला पाहिजे,
विखारी नजरेला भिडला पाहिजे..!

©आदर्श....✍️ कामगारा
White कामगारा....ऊठ,
तू लढला पाहिजे,
विखारी नजरेला भिडला पाहिजे..!

आज धर्मपुरी उद्या धाराशिव,
मग पुणे जालना परभणी,
असे किती दिवस मोजायचं..!
सवाल आहे कामगारा तुला
धडावर मेंदूला नुसतंच ठेवून
किती दिवस बघायचं..!

तुझी निब्बर चोच
नुसतीच वाळूच्या ढिगाऱ्यात खुपसू नको;
खुपस नराधमाच्या डोळ्यात.
गळून पडली पाहिजे त्याची मुजोरी,
झाला पाहिजे साक्षात्कार त्याला कृत्याचा.!

वार कर धडक नजरेतून,
तुझे शब्द शब्द गुंजू दे नभा नभात..!
तुझे बोल भेदले पाहिजे त्याच्या छातीला
कर नरसंहार अश्या प्रवृत्तीचा..!

ठेच,नागी विषारी आताच,
तमा नको विख छळेल थोडं...!
मिटली पाहिजे जमात विखारी
नको आता भीती नको कशाची..!

कामगारा..ऊठ,
तू लढला पाहिजे,
विखारी नजरेला भिडला पाहिजे..!

©आदर्श....✍️ कामगारा