Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5251098174
  • 59Stories
  • 30Followers
  • 571Love
    0Views

आदर्श....✍️

मेरी जिंदगी एक किताब हे..

  • Popular
  • Latest
  • Video
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

कामगारांची व्यथा मांडणारी 
कोणती सभा झाली नसती.
'जी हुजूर' करणारी जमात 
भुछत्रागत उदयास आली असती..!
हे आताचं आस्थापणेतील वातावरण
तुझे दिव्यस्वप्न राहिलं असतं..!
मग तुला कळाल असतं,
AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..!

सुट्टी हा अधिकार नाही
सुट्टी साठी भीक मागावी लागते,
सरंजामी व्यवस्थेत तुला
गुलामागत जोपल जातंय,
हे वास्तव तू अनुभवलं असतं..!
मग तुला कळाल असतं,
AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..!

वेतन करार झाले,
पगार वाढ झाली,
वाढीव महागाई भत्ता भेटला,
सगळं कसं तुला सहज भेटलं...!
तुटपुंज्या पगारीवर हतबल होऊन,
तुला जगावं लागलं असतं..!
मग तुला कळाल असतं,
AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..!

ना मार्क्स भेटला असता
ना वर्गसंघर्ष कळाला असता.
समभागाची लढाई नसती
ना आंबेडकर भेटला असता..!
तुझं जगणं पार यंत्रासारखं
मटेरिअलिस्टिक झालं असतं..!
मग तुला कळाल असतं,
AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..!

©आदर्श....✍️ union

#Saffron
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

हे सिद्धार्था..!

माझ्या समवेत असंख्य 
पामरांचा,
तारणहार आहेस तू..!
माणसांच्या बुद्धिला एव्हढी 
मोकळीक देऊन स्वतःचीच 
वैचारिक चीरफाड 
करणारा एकमेव तू..!
तू दिलेली सत्याची शिकवण
आज समस्त मानवजातीला 
प्रेरित करत राहते..!
"दुःखाचे कारण तृष्णा" सांगून 
जगाला दुःखमुक्तिचा 
मार्ग दिलास..!
ऐशोआराम त्यागून केवळ 
जगाच्या कल्याणासाठी 
यातना सोसणारा तू..!
या मटेरिअलिस्टिक जगात 
आजही तुझा तो त्याग आणि 
समर्पणभाव झळकत 
राहतो बघ लक्ख..!
प्रियदर्शी अशोका सारख्या 
कैक सम्राटाला तू नम्र केले,
त्यांना तलवारी 
सोडण्यास भाग पाडले..!
तू स्वतःला मार्गदाता संबोधतोस,
मोक्षदाता नाही तू सांगलेल्या 
मार्गक्रमणात समाधान आहे .!
मध्यम मार्गाचा तू 
दिलेला उपदेश किती 
संयुक्तिक आहे आजही..!
कशाला कुणाचं निमूट 
कबूल करायचं?
आपणच आपला प्रकाश 
बनावं नि वाट धरावी नीट..!
खरंतर मानवी बुद्धिला तू 
जोखडातुन मुक्त केलंस बापडया..!
म्हणूनच तर तू बुद्ध झालास..!

©आदर्श....✍️ #God
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

बरंच काही सुटलेलं
मनातलं मनात साचलेलं
सारं सारं कथन करू
लिहू तयास जोमाने..!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!

खूप काही सोडून देऊ
कायम सारे हसत राहू
आलिंगन देऊ, सोबत राहू
साथ एकमेकांची देऊ धीराने ...!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!

रटाळ गाणे सोडून देऊ
गीत नवे गात राहू..
विसरून सारे वाद कालचे
नवे संवाद पेरत जाऊ..
पुढे पुढे जात राहू पुन्हा जोमाने.!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने..!

©आदर्श....✍️ #Newyear2024
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

बरंच काही सुटलेलं
मनातलं मनात साचलेलं
सारं सारं कथन करू
लिहू तयास जोमाने..!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!

खूप काही सोडून देऊ
कायम सारे हसत राहू
आलिंगन देऊ, सोबत राहू
साथ एकमेकांची देऊ धीराने ...!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!

रटाळ गाणे सोडून देऊ
गीत नवे गात राहू..
विसरून सारे वाद कालचे
नवे संवाद पेरत जाऊ..
पुढे पुढे जात राहू पुन्हा जोमाने.!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने..!

©आदर्श....✍️ #Newyear2024
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

Year end 2023 बरंच काही सुटलेलं
मनातलं मनात साचलेलं
सारं सारं कथन करू
लिहू तयास जोमाने..!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!

खूप काही सोडून देऊ
कायम सारे हसत राहू
आलिंगन देऊ, सोबत राहू
साथ एकमेकांची देऊ धीराने ...!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!

रटाळ गाणे सोडून देऊ
गीत नवे गात राहू..
विसरून सारे वाद कालचे
नवे संवाद पेरत जाऊ..
पुढे पुढे जात राहू पुन्हा जोमाने.!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने..!

©आदर्श....✍️ #YearEnd
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

दडपशाहीने संपत नाही 
भगत सिंग..
उगवत राहतो निरंतर 
विचारातून,
पुस्तकातून,
आणि
सुपीक मस्तकातून..!

कॉम्रेड ❤️

©आदर्श....✍️ भगत सिंग

#kitaab
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

एक होती इर्शाळवाडी..

कोणी सिनेमा बघण्यात
कोणी झोपायच्या तयारीत,
आई लेकरात,मित्र मित्रात,
कोणी प्रणयात तर कोणी 
गहन स्वप्नांत गुंग होते..!

रात्रीचे अकरा वाजले होते
सर्वजण आपापले कामे
आटपून नेमकेच सावरायला
लागले होते..!
डोंगराची आजवरची 
माया कोरडी झाली
दरड कालपर्यंत शोभून
दिसायची,
आज मात्र रागाने लाल झाली,
तिचा अहंभाव जागा झाला,
ती कोसळली भयाण रात्रीत 
बेचिराख केल्या अनेक कथा..!
स्वप्न थांबले,
हसू रुसले,
गाणे संपले,
आकांत वाढत होता.
वाचवा वाचवा चा सूर 
सर्वदूर गुंजत होता...!

©आदर्श....✍️ #Barsaat
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

एक होती इर्शाळवाडी..

कोणी सिनेमा बघण्यात
कोणी उद्याच्या तयारीत,
आई लेकरात,मित्र मित्रात,
कोणी प्रणयात तर कोणी 
गहन स्वप्नांत गुंग होते..!

रात्रीचे अकरा वाजले होते
सर्वजण आपापले कामे
आटपून नेमकेच सावरायला
लागले होते..!
डोंगराची आजवरची 
माया कोरडी झाली
दरड कालपर्यंत शोभून
दिसायची,
आज मात्र रागाने लाल झाली होती,
तिचा अहंभाव जागा झाला होता,
ती कोसळली आणि
भयाण रात्रीत बेचिराख 
केल्या अनेक कथा..!
स्वप्न थांबले,हसू रुसले,
गाणे संपले,
आकांत वाढत होता.
वाचवा वाचवा चा सूर 
सर्वदूर गुंजत होता...!

©आदर्श....✍️ #Barsaat
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

आई

आई हसते तेंव्हा 
हसायला लागतो मी
हसायला लागतात भिंती
दरवाजे खिडक्या
आणि खिडक्यांची पडदेही..!

आई हसते तेंव्हा
माझं जग प्रफुल्लित होते
जखमा नरमतात
आसवांना नवेपण येते
बहरत राहतात
समाधानाच्या कैक पालव्या सर्वांगात..!

पण ती जेंव्हा रुसते
तेंव्हा माझ्या आकाशाला भोकं पडतात
माझी जमीन भेगाळते
तरीही जमीन साठवू शकत नाही 
अश्रूंना..!

©आदर्श....✍️ #MothersDay
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

कामगारा,
तू व्हिलन आहेस व्यवस्थेतला..!

तू ताजमहाल बांधू शकतोस
पण मालकी हक्क आला
की तुझे हात तोडले जातात
तुला बेचिराख केले जाते 
सरंजामशाहीकडून..!
तुझं अस्तित्व,
तुझी कसरत,
संपवली जाते तूच बांधलेल्या भिंतीवर
पजेशन चे लेबलं लावून..!
कामगारा,
तू व्हिलन आहेस व्यवस्थेतला..!

तु व्यवस्थेच्या प्रत्येक 
कामात मध्यभागी असतोस
तुला बहाल केलं 
जातं मोठेपणाचं आभासी बिरुद..
पण तुझी समभागाची मागणी
तोडली जाते नियमांच्या टोपलीतून..!
उन्हाच्या विरोधात कट करणाऱ्या 
झाडागत तुला तोडले जाते
वाटेत उभा राहिलास म्हणून..!

कामगारा,
तू व्हिलन आहेस व्यवस्थेतला..!

©आदर्श....✍️ #RepublicDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile