पुढे चालताना जगणे विसरू नका कोणी ? चालत गेलो चालतच गेलो अन् शेवटी मी पोहचलो.. किती आनंद तो शेवटी पोहचण्याचा ? मग सांगा इथे आम्ही काय विसरलो.. मधी आले होते जंगल घनदाट त्यातुन ही काढली त्याने वाट. तरी तसाच चालला होता तो सुसाट ज्ञान घेण्याचे विसरला, त्या तिथले ते अफाट.. मध्येच भेटली टवाळ पोरं त्यां मित्रांना पाहुन झाला दुर. नाही मिसळला त्याने सुरात सूर काय विसरला इथे तो ,मग सांगा बरं.. आनंदमयी हे जीवन किती सुंदर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किती धावपळ. जगायचे सोडून दुरचा करतो आपण विचार असाच घालवतो माणुस चालुचा सुवर्ण वर्तमानकाळ. कवी - सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #goal.#run.#positivethrought.#throught. #alone