Nojoto: Largest Storytelling Platform

*भेट आपली* भेट आपली आठवते अजुन त्या दिसाची क्ष

 *भेट आपली*


भेट आपली आठवते अजुन त्या दिसाची 
क्षण होते गुलाबी, साथ विश्वासाची 

झोंबे थंड वारा,आगेचा डोंब सारा 
मुक्या शब्दातुन वाहे, मुकाच सुस्कारा 
मनाला चाहुल नव्हती जरा ही कशाची 


गेले होते भांबावुन लाज ही  गाली 
डोळ्यावर तेज आहे गुलाबी लाली 
भावना सांभाळुन चाख गोडी ऊसाची 

अवचित भेट आपली सहज घडे 
मनात नसतांना नजरेवर नजर पडे 
फुले उमलून आली मधाळ रसाची 

नजरेवर भिडता नजर गेले मोहरुन 
शुभ्र चांदण्यात आले अंग शहारुन 
बिलगुन तुझ्याशी यावी धुंदी पावसाची 

गुलाब साक्ष त्या दिसाची आठवण 
विश्वासाने घेऊन यावे ती साठवण 
दरवळ अजुनही वाहे त्या सुवासाची 

दुर्गा देशमुख, परभणी 
दि 3/5/21

©Durga Deshmukh
  आठवते भेट त्या दिसाची

आठवते भेट त्या दिसाची #मराठीकविता

117 Views