Nojoto: Largest Storytelling Platform

कसं आयुष्य जगायचं ज्याचं त्यानं ठरवायचं.. जगलेल्


 कसं आयुष्य जगायचं
ज्याचं त्यानं ठरवायचं..
जगलेल्या आठवणींना
फुलासारख सजवायचं.

हसायचं की रुसायचं 
आपलं आपण ठरवायचं ..
इतरांच्या आयुष्यात
कधी नाही पडायचं..

स्वतःच स्वतःला 
शहाणपण शिकवायच..
दुसऱ्यांच्या आयुष्यातून 
जरा लांबच राहायचं..

तुम्हाला काय करायचं
अस सहज कोणी बोलायचं ..
तोडून कोणी बोललं तर 
आपण ही बोलायचं..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  दुरावा