Nojoto: Largest Storytelling Platform

दिवस सुखाचा एकच मिळतो माझ्या सर्जाला वर्षभर मात्र

दिवस सुखाचा एकच
मिळतो माझ्या सर्जाला
वर्षभर मात्र राही
त्याला कामाला जुंपलेला..

बळीराजाचा हो साथी
राबराबतो त्याच्यासाठी
शेतात राबून रात्रंदिनी
पिकवी धन्यासाठी मोती..

आज दिवस राजा तुझा
नैवेद्य पुरण पोळीचा
तूच माझा सोबती
तूच माझा खरा सखा..

@वैशाली Y ✍️
ध्रुवतारा ✨💫

©Vaishali Yenugwar
  पोळा..

पोळा.. #मराठीकविता

165 Views