चाललो ज्या वाटेवरी सोबत कुणाची नाही तव सावली स्वतःची घुटमळे माझ्या पायी दुर दुर जाते वाट शोध जगण्याचा घेत चालताना दिसे मज आठवांचा एक श्वेत नीरव शांत किनारी सांज गहिवरलेली पाणावले डोळे माझे पापण्यांना नीज आली तिथे विसावले मन स्वप्नात रंगूनी गेलो एक दिवस मी माझा आज सागराचा झालो पहाटेचा जल स्वर सागरी सनसनाट लाट लाटांवर येता सुरू होते तीच वाट ~ विलास भोईर ( चाललो ज्या वाटेवरी ) ©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी #footsteps