Nojoto: Largest Storytelling Platform

शीर्षक :- मायेच्या झालरी अशा आहेत सुरेख बाई माय

शीर्षक  :- मायेच्या झालरी 

अशा आहेत सुरेख बाई मायेच्या झालरी
चला माझ्या सयांनो सणाला जाऊ या माहेरी  !!धृ !!

सखी सासुरवाशीन न्यावया येतो बंधु
सण येता जवळी इच्छा माहेराची ही सांधू
पडे या मनाला भुरळ त्यात श्रावण सरी  !! १!!

सणाचा महिना येताच जाते लेक माहेरी 
बहरून जाते सृष्टी सारी पुण्याईचं भारी
मात्या पित्याच्या काळजाची लेक लाडकी प्यारी !! २!!

सणात सण श्रावण मास महान साजरा
करी सारे सण गोळा जगामधे आहे खरा
सय माहेराची येता सखी हसरी लाजरी !! ३!!

माहेराची वाट माझी अशी आहे चितचोर 
गाती रुणुझुणू पाखरे गाणी मनविभोर
उत्साहात गुणगुण होते माझे मनभरी !!४!!

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा. सोलापूर 
✍🏻

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

©Smita Raju Dhonsale
  शीर्षक  :- मायेच्या झालरी 

अशा आहेत सुरेख बाई मायेच्या झालरी
चला माझ्या सयांनो सणाला जाऊ या माहेरी  !!धृ !!

सखी सासुरवाशीन न्यावया येतो बंधु
सण येता जवळी इच्छा माहेराची ही सांधू
पडे या मनाला भुरळ त्यात श्रावण सरी  !! १!!

शीर्षक :- मायेच्या झालरी अशा आहेत सुरेख बाई मायेच्या झालरी चला माझ्या सयांनो सणाला जाऊ या माहेरी !!धृ !! सखी सासुरवाशीन न्यावया येतो बंधु सण येता जवळी इच्छा माहेराची ही सांधू पडे या मनाला भुरळ त्यात श्रावण सरी !! १!! #मराठीकविता

57 Views