गोफनेतून दगडाची पकड सुटावी तशी कवी मनासमोर शब्द नाचावी... शब्दं ते कदाचित अवघडलेलेे असावी आणि शब्दानिही पावलोपावली चपळाई करावी ... मेघमालेतून वीजही लखलखावी अन् कल्पनामय काव्य कागदावरती नकळत उत२ावी दिवस-रात्र् आशयाने बोलावी बासरीचे सुमधुर सुर दाटावी... तत्परतेने मनाचे शब्दकवाडे उघडावी मंतरलेल्या ओळीत क्षण मोहरावी... सावरलेल्या त्या क्षणात कोडी पडावी आभासातील कल्पनांना पाझर फुटावी... शब्दाची पकड जुळवत मन मिश्रणाची संबळी बांधावी लेखणीने भन्नाट काव्य टिपत जावी दोनाच्या चार ओळीत पंक्ती भासावी .......