रात्र... ========================== तुझे रूप शोधताना भटकून रात्र गेली पाहून स्वप्न तुझे ग नकळत रात्र गेली पहिली भेट होती नागमोडी वळणावर आठवात तुझ्या ग सारी जागून रात्र गेली आसुसले डोळे माझे बिलगून भावनेशी पाहता रूप तुझे माझी रात्र पोरकी झाली मोकळ्या केसात तुझ्या ग मोगरा सजलेला सुगधं घेता घेता मज स्पर्शून रात्र गेली काळोखात सखे येई चाहूल तुझ्या येण्याची खिडकीत चांदणी ग चमकून रात्र गेली ========================== ल गा गा गा l ल गा गा गा l ल गा गा गा @अविनाश लाड,राजापूर-हसोळ रात्र...