Nojoto: Largest Storytelling Platform

पर्जन्याची सकाळ मुक्या माळरानाखाली, शांत काळोख ग

पर्जन्याची सकाळ 

मुक्या माळरानाखाली, शांत काळोख गोठला,
पर हालवीत पक्षी, उतरनीला आला.

माय पिलांसाठी आण, येती तोंडात घेऊन,
गेली सावली सरुन, पक्षी करती जागरण.

चंद्र संपायला आला, रात पाण्यात भिजली,
कोवळया सुर्यफुलात, पिवळी सकाळ सांडली.

कोंबडा प्रहरी आरवला, शेतकरी दादा जागा झाला,
ग्रीष्मातल्या सकाळी, पावसाचा संकेत आला.

पाहून अस्तब्ध ते वारे, गाणी गातो ढग पांढरे,
नाचतील मयुरही, फुलवून आपली पिसारे.

चमकेल वीज गगनी, बरसेल वर्षाव पाणी,
होईल संतुष्ट धरणी, गातील पक्षी गाणी.

आला आला हा पावसाळा, घेऊन थोडा गारवा,
जमीनीवर मन मोकळा, रंग एकच हिरवा.

©Kapil Shivram Savaleshavarkar
  ©कपिल सावळेश्वरकर- जीवाचे चांदणे

©कपिल सावळेश्वरकर- जीवाचे चांदणे #मराठीकविता

312 Views