Nojoto: Largest Storytelling Platform

अभंग ३ ( चादर) आपुल्या इच्छेला॥ मर्यादा असावी॥ भ

अभंग ३ ( चादर)

 आपुल्या इच्छेला॥ मर्यादा असावी॥
भरारी मारावी॥ सांभाळून ॥१॥

पाय पसरावे ॥ पाहुन चादर ॥
मोठ्यांचा आदर ॥ सदा असो॥२॥

नको उतमाज ॥ स्थितीचा अंदाज ॥
मनाचा आवाज ॥ ओळखावा॥३॥

मोहमयी जग॥ दुरच रहावे॥
विचार करावे॥ जीवनात ॥४॥

साधुसंत सांगे ॥ जगण्याची रित ॥
छोटेशे गणित ॥ आयुष्याचे ॥५॥

बोले माझा साई ॥ खुप होती शक्ती॥
लोक करे भक्ती॥ ऐकोप्याने॥६॥

पाण्यातुन दिवे॥  साईने लाविले ॥
अमृत पाजिले॥ ज्ञानाचेच॥७॥

मर्यादित इच्छा ॥ साई म्हणे ऐसा॥
मंत्र ऐका तैसा ॥ जगण्याचा ॥८॥

इच्छेची चादर ॥ मर्यादित ठेवा ॥
समजुन घ्यावा ॥ महामंत्र ॥९॥

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  # चादर

# चादर #मराठीकविता

347 Views