Nojoto: Largest Storytelling Platform

अचानक आज सकाळी एक बाई दारी आली बाहेरूनच म्हणाली एक

अचानक आज सकाळी
एक बाई दारी आली
बाहेरूनच म्हणाली
एक भाकरी द्या ताई..

केविलवाणा चेहरा पाहून
मला आली तिची दया
घरातून आणून भाकरी
तिच्या हातात ठेवली पहा..

घेऊन भाकरी हातात
दिला तिने आशीर्वाद
नांद बाई तू सुखाने
तूझ्या या संसारात..

वैशाली Y ✍️
ध्रुवतारा ✨💫

©Vaishali Yenugwar
  भाकरी

भाकरी #मराठीकविता

147 Views