Nojoto: Largest Storytelling Platform

हरवलेली स्वप्न होती विखुरलेले विचार पुसट पुसट आठवण

हरवलेली स्वप्न होती
विखुरलेले विचार
पुसट पुसट आठवणी
नि अर्धवट प्रचार

म्हणूनच झाला नाही
उत्कर्ष आजवर
कर्म करण्याआधी 
नियोजन कुठे खरं ?

नियोजनापूर्वी आपलं
ध्येय निश्चित हवं ।
हे करु का ते करु
यात डोकं पिकलं खरं ।।

बिझनेस करण्यासाठी 
जिद्द तर हवीच ।
पण त्यासोबतच
यशस्वी मनोवृत्ती हवी ।।

हरलो म्हणजे संपलं नाही
थांबलो म्हणजे संपलं ।
कितीदाही गणित जरी फसलं
तरी स्पिरीट आम्ही जपलं ।।

घरटं मोडणारा थकतो
पण पक्षी थकत नाही ।
यशाच्या रहस्याचं 
यातच सारं बिज लपलं ।।

©Mangesh P Desai
  #हरवलेली स्वप्न होती....

#हरवलेली स्वप्न होती.... #मराठीकविता

524 Views