आकाशात तारे जमले होते तेव्हा... स्वप्नात माझ्या आला होतास तू तेव्हा... गुलाबी थंडीत झोप गेली होती लागून... होतास तू माझ्या बाजूलाच तेव्हा... हात तुझा माझ्या केसात अडकलेला... जाग आली मला झोपेतून तेव्हा... चांदण्यात रमायचे राहूनच गेले... डोळे उघडताच उजाडून गेले तेव्हा... स्वपनाच्या दुनियेत जगायचे होते... पण मनातली चिंता खुणावत होती तेव्हा...