White जीवन गणित शब्दवेडा किशोर मानवी जीवन लय असे अवघड गणित वजाबाकी अन् बेरजेत आपण सारे सदा गुंततसे सरळ रेषेचा काही कधी विचार न करता काटकोनी रस्ताच सारे सदा चालतसे स्वतः जीवनाचे मांडतात सारेच इथं सिद्धांत माझंच आहे खरं हे जनात सांगतसे दुसऱ्याचे प्रमेय नाही सोडवित आपल्याच अंशात जो तो इथं जगतसे त्रीकोनी विचारांनी अडके जो तो जीवनाच्या अवघड वर्तुळात कोळीच्या जाळ्यागत राहतसे वर्तुळा बाहेर जव पडता मानव ईश्वरी स्पंदन तयास लाभतसे शब्दवेडा किशोर सांगतो पेरावे रे प्रेम प्रेमाचे रे धान मग उगतसे ©शब्दवेडा किशोर #Couple मराठी कविता संग्रह