Nojoto: Largest Storytelling Platform

राजकारण…" किती साधा आणि सरळ शब्द आहे… पण याचा नेमक

राजकारण…" किती साधा आणि सरळ शब्द आहे…
पण याचा नेमका अर्थ सांगायला… शब्दकोशही निशब्द आहे…
कसाही पाहिला तरी… हा शब्द बरबटलेलाच दिसतो…
इथे उभा प्रत्येकजण… त्या चिखलाने माखलेला असतो…

पिढ्यान पिढ्या चालत आलंय… म्हणे याचा इतिहास खूप मोठा आहे…
जमेल तिथे मूळं रोवत आलंय… याचा पसारा फार मोठा आहे…
कधी सत्तेसाठी कधी पैशासाठी… तर कधी नुसता सूड घेण्यासाठी…
राजकारण खेळलं जातंय… जनतेचा जीव घेण्यासाठी…

राजकारण कसं खेळावं… याला कुठलेच नियम नसतात…
काय मिळालं काय गमावलं… याची गणितच निराळी असतात…
आई-बाप, काका-मामा… इथे प्रत्येकजण वैरी असतो…
एकट्यानेच जगतात सगळे… इथे जिवाभावाचा कोणीच नसतो…

©DIPRESH SAWANT 
  #राजकारण