Nojoto: Largest Storytelling Platform

बैलपोळा आला बैलपोळ्याचा ग सण बैलाला बांधिते बाशि

बैलपोळा

आला बैलपोळ्याचा ग सण 
बैलाला बांधिते बाशिंग 
खांदेमळण करुन त्याची 
गोंडा बांधा त्याच्या शिंग 

बैलपोळ्याच्या ग सणाला 
चढवा अंगावर झुल 
त्याला जेवायचे द्या निमंत्रण 
बैल कसा रुबाबात डुल 

वर्षभर राबतो शेतात 
परतफेड ऋणाची 
एक दिवस देऊन आराम 
कोठी भरतो धनाची 

शेतात राबतो कष्टतो 
एक दिवस त्याला मान 
रात्रंदिन कष्ट करुन 
शेतात उगवितो धान 

आज काढु बैलाची मिरवणुक 
त्याला आपलेपणा वाटेल 
त्याचे नाळ शेतक-याशी 
दोघांचाही कंठ दाटेल 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  बैलपोळा

बैलपोळा #मराठीकविता

45 Views