Nojoto: Largest Storytelling Platform

$आई$ ****** आई असते देवळाच्या गाभार्यातील तीर्थ प


$आई$
******
आई असते देवळाच्या गाभार्यातील तीर्थ पावन,
आई असते ग्रीष्मात ही बरसनारा सुखद श्रावण.
आई म्हणजे तुकोबाची तरंगनारी अभंग गाथा,
आईच्या चरणी उगीच नाही देवही टेकवित माथा.
आई असते तिन्ही त्रिकाळ प्रसन्न असणारा देव,
आईच्या मनात का कोणास ठाऊकअसत नाही भेद.
आई असते विश्वातल्या प्रेमाचे विशुद्ध सत्त्व,
आईचे मायेने कुरवाळने सांगते त्याचे 
महत्व.
आईने मात्र जायची उगाच करू नये घाई,
आईच निघून गेली तर सुन्या भासतात दिशा दहाही.
************************
प्रविण लोहार,
जळगाव

©pravin lohar
  #Mमेरी दुनिया है माँ तेरे आंचलमेothersDay
pravinlohar3803

pravin lohar

New Creator

#Mमेरी दुनिया है माँ तेरे आंचलमेothersDay #मराठीकविता

264 Views