Nojoto: Largest Storytelling Platform

कधी हात सुटून गेले कळलेच नाही,चालता चालता सावरत

कधी हात सुटून 
गेले कळलेच नाही,चालता 
चालता सावरत होतास उगाच
कधी माझे भार उचलत होतास,
माझ्या आयुष्यात तुझाच पहिला 
आणि  शाश्वत स्पर्श एक प्रेमळ 
धाक आणि त्याच हातांची प्रेमाची 
भरली ओंजळ, ती ओंजळ कधी 
रिकामी झालीच नाही,जादूगाराने 
आपल्यामागण्या पूर्ण कराव्यात 
तशीस्वप्ने पूर्ण करत होतास, आणि
स्वतःचे मन मारून ,आमचे मन
भरत होतास,तू जेंव्हा जेंव्हा 
यायचास तेंव्हा किती घर भरून
जायचे,तू जाताना मात्र मी वाहून
जायचे,तू आलास कायमचा तेंव्हा
किती आनंद झाला होता,पण
नंतर कळले तू तर मृत्यूचा फतवा
समवेत घेऊन आला होतास
तू जवळ असूनही ,दूर जाण्याची
मनात एक कायम भीती 
आता डोळ्यांच्या पाण्यात 
धुरकटलेली विझणारी
 दिसत होती नाती
तू माझा बाबा म्हणून आलास 
आणि स्वतः मात्र देव होवून गेलास
तू जाताना किती गळा दाटला होता
आता तुझा नी माझा ऋणानुबंध 
अलगद निसटला होता ,
तुझा शेवटचा हात माझ्या गालावर
फिरला आणि तुला पाहतानाच 
मी हुंदका गिळला,आता तू फिरून 
येऊ नकोस ,सवय झालीय मला 
आता विनाधार जगण्याची
फक्त मी जेव्हा येईल तेव्हा ,मला तू
तुझ्या हातांचा आधार दे,जे काही 
कौतुक करायचे राहिले ते डोळ्यात
साठवून घे त्या कौतुकात मला नहायचे
आणि मनसोक्त तुझ्या मिठीत वाहून जायचय

               पल्लवी फडणीस,भोर✍
कधी हात सुटून 
गेले कळलेच नाही,चालता 
चालता सावरत होतास उगाच
कधी माझे भार उचलत होतास,
माझ्या आयुष्यात तुझाच पहिला 
आणि  शाश्वत स्पर्श एक प्रेमळ 
धाक आणि त्याच हातांची प्रेमाची 
भरली ओंजळ, ती ओंजळ कधी 
रिकामी झालीच नाही,जादूगाराने 
आपल्यामागण्या पूर्ण कराव्यात 
तशीस्वप्ने पूर्ण करत होतास, आणि
स्वतःचे मन मारून ,आमचे मन
भरत होतास,तू जेंव्हा जेंव्हा 
यायचास तेंव्हा किती घर भरून
जायचे,तू जाताना मात्र मी वाहून
जायचे,तू आलास कायमचा तेंव्हा
किती आनंद झाला होता,पण
नंतर कळले तू तर मृत्यूचा फतवा
समवेत घेऊन आला होतास
तू जवळ असूनही ,दूर जाण्याची
मनात एक कायम भीती 
आता डोळ्यांच्या पाण्यात 
धुरकटलेली विझणारी
 दिसत होती नाती
तू माझा बाबा म्हणून आलास 
आणि स्वतः मात्र देव होवून गेलास
तू जाताना किती गळा दाटला होता
आता तुझा नी माझा ऋणानुबंध 
अलगद निसटला होता ,
तुझा शेवटचा हात माझ्या गालावर
फिरला आणि तुला पाहतानाच 
मी हुंदका गिळला,आता तू फिरून 
येऊ नकोस ,सवय झालीय मला 
आता विनाधार जगण्याची
फक्त मी जेव्हा येईल तेव्हा ,मला तू
तुझ्या हातांचा आधार दे,जे काही 
कौतुक करायचे राहिले ते डोळ्यात
साठवून घे त्या कौतुकात मला नहायचे
आणि मनसोक्त तुझ्या मिठीत वाहून जायचय

               पल्लवी फडणीस,भोर✍