Nojoto: Largest Storytelling Platform

#साविञी धर्मांधांनो तुम्ही काल ही साविञीचा छळ केल

#साविञी

धर्मांधांनो तुम्ही काल ही
साविञीचा छळ केला 
अन् आजही करता..
तरीही....
तुमच्यातल्याच 'काशीचा'
'यशवंत' तीने कालही 
सांभाळला अन् आजही 
सांभाळत आहे.

बघा ना तुम्हीच काल
तिरस्कारेला भिडेवाडा
आजही दुर्लक्षीत आहे...
तरीही...
तिने काल फोडलेला 
शिक्षणाचा पाझर आजही
विद्यापिठरूपी ओसांडत आहे.

ती 'लक्ष्मीची' कन्या
विद्येची 'सरस्वती'आहे पण
वटवृक्षाला पुजणार्यापासून
थोडी ती अलिप्त ही आहे
तरीही...
तिला मानणार्या कालही 
अत्युच्च शिखरावर गेल्या
अन् आजही जात आहेत

आठवता साविञी
प्रश्न एवढाच उरेन
सोडाल का धर्मांधपणा 
साहित्य 'तीच' वाचून ?
विचार ही स्विकारा थोडे
जळमटलेल्या मेंदूवर घासून 


- सरकटे मिलिंद मुरलीधर

©milind sarkate #सावित्रीबाई फुले
#साविञी

धर्मांधांनो तुम्ही काल ही
साविञीचा छळ केला 
अन् आजही करता..
तरीही....
तुमच्यातल्याच 'काशीचा'
'यशवंत' तीने कालही 
सांभाळला अन् आजही 
सांभाळत आहे.

बघा ना तुम्हीच काल
तिरस्कारेला भिडेवाडा
आजही दुर्लक्षीत आहे...
तरीही...
तिने काल फोडलेला 
शिक्षणाचा पाझर आजही
विद्यापिठरूपी ओसांडत आहे.

ती 'लक्ष्मीची' कन्या
विद्येची 'सरस्वती'आहे पण
वटवृक्षाला पुजणार्यापासून
थोडी ती अलिप्त ही आहे
तरीही...
तिला मानणार्या कालही 
अत्युच्च शिखरावर गेल्या
अन् आजही जात आहेत

आठवता साविञी
प्रश्न एवढाच उरेन
सोडाल का धर्मांधपणा 
साहित्य 'तीच' वाचून ?
विचार ही स्विकारा थोडे
जळमटलेल्या मेंदूवर घासून 


- सरकटे मिलिंद मुरलीधर

©milind sarkate #सावित्रीबाई फुले