Nojoto: Largest Storytelling Platform
milinds6839
  • 145Stories
  • 878Followers
  • 2.2KLove
    742Views

milind sarkate

Instagram.id @sarkate_milind सहज मनातुन लिहितोय...भावनेच्या शब्दांचे यमक जुळवून पाहतोय MH-22 parbhani

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

वर्ष संपत आले तरीही
या लाटा धडकत आहेत
 तुझ्याशिवाय पुन्हा उभे
राहायच ठरवलय पण 
लाटेमुळे पायाखालची
वाळुही सरकत आहे
😔

©milind sarkate #sagarkinare
7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

प्रेम म्हणजे शारीरिक
 भुक भावणारा संभोग नव्हे
आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत
एकमेकांच्या सुख दुःखाचा
 संयोग म्हणजेच प्रेम..

©milind sarkate #Love
7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

आयुष्यातील दुःखाच्या वस्ञाला 
 एक पैसा ही न घेता
आनंदाचे रेशमी अस्तर
लावणारा शिंपी म्हणजेच 
आपले मिञ...😍

©milind sarkate #friendship
7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

जगात दुःख आहे,
 दुःखाचे मुळ कारण तृष्णा आहे, 
तृष्णा म्हणजे मला काहितरी 
सतत मिळाले पाहिजे ही भावना, 
तृष्णेची पूर्ती न झाल्यानेच 
दुःख निर्माण होते.
- तथागत गौतम बुद्ध

©milind sarkate #Buddha_teachings
7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

आठवणीचा उदास किनारा
अन् तो झुरझुरणारा वारा..
दूरच्या त्या प्रेमाच्या शहरात
बंदिस्त राहिला खेळ सारा...

©milind sarkate #AloneInCity
7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

दलित अन्याय अत्याचारची 
मालीका खंडीत होत नाही 
स्वातंत्र्य नावाची रंडी
कधी इथं नांदत नाही 
मुकी बहिरी झाली 
हि वांझ व्यवस्था 
आक्रोश हिला दिसत
 नाही 
- नामदेव ढसाळ

©milind sarkate #JusticeAndRevenge
7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

मैञी.. 

मैञी हवी असते 
दुःखाशी भिडण्यासाठी 
मतलबी दुनियेत 
झुंजारपणे लढण्यासाठी 

मैञी हवी असते 
निखळ आनंदासाठी 
मनासारखं खुप सारं 
मनसोक्त बोलण्यासाठी

मैत्री हवी असते
मदतीच्या आरोळीसाठी
भेगाळलेल्या आयुष्यात 
ओलावा भरण्यासाठी 

मैञी हवी असते 
उणेपणा झटकण्यासाठी 
भरकलेल्या मनाला
शांत स्थिरावा देण्यासाठी 

मैञी हवी असते 
अश्रुंना थांबवण्यासाठी 
क्षणभरात खुप सारं 
भरभरून जगण्यासाठी 

-सरकटे मिलिंद मुरलीधर
9307240658

©milind sarkate #friendship
7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

तथागत..

मानवाच्या कल्याणासाठी 
त्यागले ऐश्वर्य तुम्ही 
दुःख मुक्तीच्या शोधात
केला असिम त्याग तुम्ही

आर्यसत्ये,अष्टांगिकमार्गाचे
दिले नवे ज्ञान जगा तुम्ही 
कर्मकांडाच्या धर्मांना
दिले नवे तत्वज्ञान तुम्ही

दिन-दुबळ्यांच्या दुःखावर
मारली प्रेमाची फुंकर तुम्ही 
मी मोक्षदाता नव्हे,मार्गदाता आहे
जगाला सांगीतलं तुम्ही 

धम्मदिक्षेची दारं स्ञीयांना 
केली मुक्तपणे खुली तुम्ही 
युध्दाच्या तलवारी ही खुप 
सार्या म्यान केल्या तुम्ही 

धर्माच्या जुन्याच साच्यात 
नव्याने ज्ञान ओतलं तुम्ही 
सत्याच्या मार्गाचे नवे
मार्गदाता झाले तुम्ही..

©milind sarkate #BuddhaPurnima
7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

युध्द हा 
 कोणत्याही प्रश्नाचा अंतिम निर्णय नाही,
 उलट एका युध्दाने 
दुसर्या युध्दाची बीजे पेरली जातात, 
म्हणून शक्यतो कोणतेही प्रश्न शांततेने
 व समोपचाराने सोडवले पाहिजेत
- तथागत भगवान बुद्ध..

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

💙🧡💙

©milind sarkate #Buddha_purnima
7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

ती वेळ निघून गेलीय...
पण आठवणी माञ तशाच आहेत..
आणि..
तु नाकारलेला टवटवीत गुलाब माञ
माझ्या मनासारखाच खिन्न आहे..
💔

©milind sarkate #Rose
loader
Home
Explore
Events
Notification
Profile