Nojoto: Largest Storytelling Platform

White #नवा जन्म घेण्या.. शब्दवेडा किशोर आहे सुखात

White #नवा जन्म घेण्या..
शब्दवेडा किशोर 
आहे सुखात सारे इतकेच बास आहे
सध्या खुशाल असणे ही बाब खास आहे 
धुंदीत कुणी इथं अन् कुणी नशेत येथे
अन् मोजके कुणाचे उरलेत हे श्वास आहे  ll१ll
पैसा हवा कुणाला हवी गाडी कुणास मोठी
अन् एक भाकरीची कुणाला एक मोठी आस आहे 
टक्के कमी मिळाले कुणास दुःख याचे आहे
तर नाही खुशीत कुणी होऊन पास आहे
दिनरात कष्ट करूनी शिकवेल मी मुलाला
बापास तो अडाणी पण त्यास हाच एक ध्यास आहे  ll२ll
कुणास कळे न कैसा हा घालवू दिवस मी ?
पडती कमी कुणाला चोवीस तास आहे
गेले धनाढ्य पळुनी बुडवून कर्ज सारे मरतो
शेतकरी रोज इथला घेऊन फास आहे
काही नसूनसुद्धा मौजेत कुणी
अन् ऐश्वर्य भोगुनीही कोणास मात्र सदा त्रास आहे ll३ll
असलेले नसलेले हे वैभव मी खूप भोगले आहे
सदा स्वतः शापित राहुनिया
इतरांचे घरं मी भरवलेले आहे
इतरांना सुखं वाटुनिया माझ्या हातास
सतत मी रितेच ठेवले आहे 
आता देऊनी जीवास आराम नवा जन्म घेण्या
मी पुन्हा देवाकडे जात आहे                    ll४ll

©शब्दवेडा किशोर #Sad_Status  लाईफ कोट्स
White #नवा जन्म घेण्या..
शब्दवेडा किशोर 
आहे सुखात सारे इतकेच बास आहे
सध्या खुशाल असणे ही बाब खास आहे 
धुंदीत कुणी इथं अन् कुणी नशेत येथे
अन् मोजके कुणाचे उरलेत हे श्वास आहे  ll१ll
पैसा हवा कुणाला हवी गाडी कुणास मोठी
अन् एक भाकरीची कुणाला एक मोठी आस आहे 
टक्के कमी मिळाले कुणास दुःख याचे आहे
तर नाही खुशीत कुणी होऊन पास आहे
दिनरात कष्ट करूनी शिकवेल मी मुलाला
बापास तो अडाणी पण त्यास हाच एक ध्यास आहे  ll२ll
कुणास कळे न कैसा हा घालवू दिवस मी ?
पडती कमी कुणाला चोवीस तास आहे
गेले धनाढ्य पळुनी बुडवून कर्ज सारे मरतो
शेतकरी रोज इथला घेऊन फास आहे
काही नसूनसुद्धा मौजेत कुणी
अन् ऐश्वर्य भोगुनीही कोणास मात्र सदा त्रास आहे ll३ll
असलेले नसलेले हे वैभव मी खूप भोगले आहे
सदा स्वतः शापित राहुनिया
इतरांचे घरं मी भरवलेले आहे
इतरांना सुखं वाटुनिया माझ्या हातास
सतत मी रितेच ठेवले आहे 
आता देऊनी जीवास आराम नवा जन्म घेण्या
मी पुन्हा देवाकडे जात आहे                    ll४ll

©शब्दवेडा किशोर #Sad_Status  लाईफ कोट्स