अनामिक भेट आपली कशी अचानक झाली कळेना , हरवलो कधी कुठे.... अंतरंगात शोधू एकमेकांना. सुगंधाची लहर सांजवेळी दरवळते कोवळ्या फुलांना , स्पर्श झाला कधी कुठे.... आयुष्यात भेटु एकमेकांना. तुझे स्वप्न असेल मी आंधारातली वाट दिसेना , धडपडलो कधी कुठे.... हात हाती घेऊन सावरू एकमेकांना. ओंजळभर सुख हे सारे लपून बसले क्षणाक्षणांना , अपयश आले कधी कुठे.... दु:खात सोबत देवू एकमेकांना. 😘विलास भोईर 😘 एकमेकांना सावरताना.....