Nojoto: Largest Storytelling Platform

मुलगा आहेस म्हणून मुलानं काय कमावलं.. कमावलेल्या न

मुलगा आहेस म्हणून
मुलानं काय कमावलं..
कमावलेल्या नात्यांनी
मुलालाच नेहमी सुनावलं..

भिकारडा आहेस म्हणे 
परिस्थितीने ही खूनावलं.. 
आयुष्याच्या चित्रपटात 
माझ्यांनीच मला हरवलं..

बोलण्याच्या ओघाओघात
बरच काही जाणवलं..
नियतीच्या खेळात हरताना
डोळ ही आज पाणवलं..

झालं गेलं सार काही
हसत हसत स्वीकारलं..
का कुणास ठाऊक
डोळ्यात पाणी मात्र तरंगल..

डोळ्यात पाणी मात्र तरंगल..

©गोरक्ष अशोक उंबरकर संघर्ष जीवनाचा

संघर्ष जीवनाचा #मराठीकविता

108 Views