Nojoto: Largest Storytelling Platform
siddharthkhed7857
  • 33Stories
  • 75Followers
  • 220Love
    0Views

Siddharth khed

Writer, Poet.... 👉❤

  • Popular
  • Latest
  • Video
75f320cad1df5c427f9fb87f2381b966

Siddharth khed

मी स्वप्न पाहिलं

झोपेचं सोंग करुन रात्र
जागून मी स्वप्न पाहिलं
दिवस तसाच आहे मागे
स्वप्न पुढे सरकत राहिलं

आई बाबांचा कष्ट पाहून
मीही तितकं कष्ट घेत आहे
स्वप्न कधीतरी पुरे होईल 
या आशेने आजही जगत आहे

स्वप्न सत्यात उतरवताना
विसावा घेणं अवघड असतो
आई बाबांचं नाम मुखी घेत
एक एक पाऊल पुढे टाकतो 

आई बाबांचं चरण स्पर्श करून
शिवरायांच्या विचारांनी चाललो
स्वप्न पुढे मी मागे हे नेहमीच
मात्र उद्याचं दिवस मी माझं मानलो

©Siddharth khed #MessageToTheWorld
75f320cad1df5c427f9fb87f2381b966

Siddharth khed

आईच बापपण 

समईतली वात होऊनी
आजही ती जळतीच आहे
माझ्या आईतला बापपणा 
आजही मी पहातोच आहे        
                                               
आईच्या पदराने पेटलेली         
ज्योत अजून विजली नाही      
हाताच्या आडोशाने मात्र       
बाप भिंत तुटलीच नाही          
                                           
तप्त लोखंडावरी अजूनही    
ती घाव घालतीच आहे        
जीवनाला आकार देण्या   
बाप होऊनी जगतेच आहे           

तिच्या मनगटातील ताकद
पोलाद बापाची खुण आहे
माझा बाप अनं तिचा पती
शिवाय आजही जगणं आहे

माझ्या आईचा संसार गाडी रे
बाप नसताना ही धावत आहे
ती सुख अनं दुःखाच्या चाकाने
पोरांच्या विश्वासात ओढत आहे

 - सिद्धार्थ खेड

©Siddharth Khed😍 #FathersDay
75f320cad1df5c427f9fb87f2381b966

Siddharth khed

सुखाची सावली

गंध फुलांचा हिरवा पान्हा 
सर सुखाची सावली मना 
या धुंदीत आभाळ भरून
या चिंब पावसात भिजून

हलकीशी मनाचं मनाशी
भिडले जणू गडद आकाशी
दूर तरी जडले नाते कितीदा
तु जवळी येता होती फिदा

सुखाची सावली देईल साथ 
दुःखावर करिता तु मात 
प्रितीचं फुलं खुलून दिसत
स्वप्न मिरविती हास्य खुलतं

साऱ्या आठवणींना उजाळा
देता मन उधाण वाऱ्याचे फिरतं
जवळी राहून आयुष्य फुललं
सुखाने नांदत सावली मिळालं 

सिध्दार्थ खेड
७७७३९५४५८७ #UnderTheStars
75f320cad1df5c427f9fb87f2381b966

Siddharth khed

गारवा

भिजलेल्या क्षणांना आठवणींच्या वाटा
अलगद मिठीत माझ्या गारवा हा खोटा 
मन उधाण होऊनी रुजले नवी आशा
स्वप्न असे समजलेले नजरेत दाहीदिशा

रातीच्या स्वप्नांना नकळत जागूनी
निजणाऱ्या मिठीत तुझ्या येऊनी
साचलेल्या काळोखात जरा दूर दूर
माझं प्रीत नजारा उडाली भूर भूर 

गारवा हा आला अनं स्पर्शूनी गेले 
तुझ्या मिठीत येता स्वप्न हे उडाले
साऱ्या आठवणीं आज हसून निजले
स्वप्न रोज रोज येता तुलाच पाहिले 

- सिद्धार्थ खेड #raindrops
75f320cad1df5c427f9fb87f2381b966

Siddharth khed

पेरणी

हौशा, सर्जाच्या जोडीनं
माझा राजा पेरणी करतो
आभाळी अस्मानी पावसानं 
पाभरतून दाणं धीराने सोडतो  

ओल्या मातीच्या कुशीत
जणू बिया गुपचुप निजतो
ऊन, पावसाच्या मायेनं
दिवसाआडं डोकावून पाहतो 

पाठी हाक मारता राजानं
घामाच्या धारेने पाऊलें टाकतो
राजा देवादिकांच्या नावानं 
दिसांमधी मैल अंतर कापतो 

सांजवेळ बैलांना बळीराजा
कासरानं दावणीला बांधतो
चारा समंधी ढिगभर टाकून
राजा खोपट्यात झोपी जातो

सिध्दार्थ खेड, सोलापूर
मो. ७७७३९५४५८७ #citysunset
75f320cad1df5c427f9fb87f2381b966

Siddharth khed

देवा 

पावसाचं धारा बरसू दे
प्रत्येक थेंब सानिटाईझर होऊ दे
त्याने कोरोना धुवून जाऊ दे 
पुन्हा नव्याने आयुष्य जगू दे

- सिध्दार्थ खेड #height
75f320cad1df5c427f9fb87f2381b966

Siddharth khed

आयुष्य कोणाच्या तरी प्रेमाने सुखात राहावं
दुःख कितीबी असलं तरी स्वत:ला सावरावं
मरणाला न घाबरता पुन्हा पुन्हा जगावं
-सिध्दार्थ खेड #height
75f320cad1df5c427f9fb87f2381b966

Siddharth khed

मैत्रीचं नातं कधीच कोणतीही पंचांग किंवा कुडंली पाहून जोडत नाही
- सिध्दार्थ खेड #

#

75f320cad1df5c427f9fb87f2381b966

Siddharth khed

तुम्ही सुरक्षित रहा 
आम्ही कष्ट घेतो 
काहीच दिवसाचे
संकट आहे
घाबरून जाऊ नका
आम्ही खंबीर आहे
सगळं काही 
आता निट होणार
पुढे जाऊन आम्हाला
तुम्हीच धीर देणार
हाच विश्वास मनी 
ऊन, वारा, पाऊस झेलतो
तुमच्यासाठी म्हणून
सगळी संकटे अंगावर घेतो

सिध्दार्थ खेड ( सिखे )
सोलापूर #

#

75f320cad1df5c427f9fb87f2381b966

Siddharth khed

तुम्ही सुरक्षित रहा 
आम्ही कष्ट घेतो 
काहीच दिवसाचे
संकट आहे
घाबरून जाऊ नका
आम्ही खंबीर आहे
सगळं काही 
आता निट होणार
पुढे जाऊन आम्हाला
तुम्हीच धीर देणार
हाच विश्वास मनी 
ऊन, वारा, पाऊस झेलतो
तुमच्यासाठी म्हणून
सगळी संकटे अंगावर घेतो

सिध्दार्थ खेड ( सिखे )
सोलापूर #

#

loader
Home
Explore
Events
Notification
Profile