Nojoto: Largest Storytelling Platform
sanjayshinde3240
  • 4Stories
  • 5Followers
  • 8Love
    0Views

Sanjay Shinde

  • Popular
  • Latest
  • Video
afe6d7b16331bb9e60d0ee55fd357e1c

Sanjay Shinde

  हिवराचे झाड....
ओसाड माळरानावर हिवराचे झाड एवढे
एकटेच बहरले बारमाही हिरवेचं तेवढे...||ध्रु||
दिसते ते गोंडस त्याला पिवळ्या फुलांचा मान
नजरेत ना कधी त्याचं एक नाजूक पान
          फांदी फांदीवर भाल्यापरी काटे कुंपण घालुनि चोहीकडे...||१||
भर उन्हाळ्यात नाही कधी उदास पावसाळ्यात ना कधी उत मात
ना कधी कुठली कशाची आस नेहमीच त्याला हिरवळीची साथ
    माळरानावर हिरवळीनं नटलेलं म्हणूनच शोभून दिसते केवढे...||२||
बारमाही नटलेलं असतं पाना फुलांच्या हिरवळीतून
मोहक रुप त्याचं पाहून हिवूर नेहमीच दिसे तरुण
    माळरानावरच्या हिवराचं कौतुक कराया शब्द अपुरे मजकडे...||३||

afe6d7b16331bb9e60d0ee55fd357e1c

Sanjay Shinde

वनस्पती रानातली...
रानात प्रसूत झाली केळी बाई भलत्याच वेळी
बाळंतीण बाईची काळजी वेळोवेळी
काटकुळ्या बांध्याची जन्माला आली बाजरी सावळी
देठाचा आकडा करुन लटाकली घोसावळी....||१||
हूलगा मटकी कुसळात दिसेनासी झाली
बटाटी रताळी गुप्त जमिनीखाली
ऊसाने वीसेक बोटकांड्यावर मजल मारली
सुगीत ज्वारीचं मागं उरली...||२||
अंबाडी करडई साळी गहू आंब हरभर्‍याच्या भाजीतली
कुणी कोरडवाहूतली बागायती कोणी पाण्यातली
कोण कुठून कशी आली वनस्पती रानातली
पण आहे प्रत्येकाच्या जीवनातली...||३||

  #thirdquote #paidstory
afe6d7b16331bb9e60d0ee55fd357e1c

Sanjay Shinde

माझं वावर....
लाखात एक बाई माझं वावर नटलं
वार्‍याच्या झोतानं बाई कणिस झुकलं
फेरफाटका मारुन रानात, पाय सोडून पाटाच्या पाण्यात
झाडाखाली अलगद बाई हाती जांभूळ पिकलं...||ध्रु||
हिरवं गवताचं बेट, त्यातून पाऊलवाट
रानात जाऊन थेट, कणिस आलं हूरड्यात
पाना आडून रुप त्याचं बाई साजूक देखणं
दाणं टिपायला पाखरू बाई दिसतंय चिकणं
हूरडा खायला जावून रानात डवचून पाखरांच्या थव्यास...||१||
दुपारच्या या उन्हात, झाडांच्या गार सावलीत
आळं करून सूरु भोजनास ,खावून घ्यायला घास दोन घास
फळांच्या ओझ्यानं बाई झाड हळूच झुललं
फुलांच्या सुगंधानं बाई मन सहज भुललं
भोजन करून थाटामाटात, विसावा घेऊन झाडांच्या सावलीत...||२||
फिरावं एकदा रानात ,मन गुंफून पाना फुलात
किलबिल करणार्‍या पाखरांत, बहरलेल्या शिवारात
हिरव्या बहरानं बाई वावर झक्कास फुललं
फेरफाटका मारताना बाई स्मित हास्य उमटलं
फेरफाटका मारताना वावरात ,आनंद मावना माझा गगनात...||३||
  #secondquote #paidstory
afe6d7b16331bb9e60d0ee55fd357e1c

Sanjay Shinde

माझ्या मनातली तू आयूष्यातली तू 
अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू 
माझ्या मनातली...||ध्रु||
तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर.
देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१||
आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं.
सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२||
माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात.
सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३||

©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)

#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile