Nojoto: Largest Storytelling Platform
siddheshwarwayal5167
  • 48Stories
  • 4Followers
  • 431Love
    47Views

Siddheshwar Wayal

  • Popular
  • Latest
  • Video
cd7863d84c74a2f35a30135ed4ad578a

Siddheshwar Wayal

                          #झुंझार_योध्दा🚩

मनोज जरांगे पाटलांच्या रुपाने पेटली आरक्षणाची ज्वाला, 
त्याग,बलिदान,आत्मसमर्पणातून उभा राहिला प्रखर लढा,
खेड्यापाड्यात,वाड्या वस्तीवर आता एकच नारा, 
जयघोष घुमतो रानोमाळी एक मराठा लाख मराठा... 

तेजस्वी इतिहास आहे पाठीशी लढण्या,झुंजण्याचा, 
झुंझार आहे एक,एक सैनिक,धैर्यशील योध्दा, 
अनेक पिढ्यांचा मिटवण्या अंध:कार सारा,
जय हो! जयोस्तु मराठा,जयोस्तु मराठा... 

एकच मिशन,मराठा आरक्षण ध्यास घेऊनी उरी,
मावळा खिंड लढवितो अंगावर घेऊन जबाबदारी, 
जिजाऊंचा आशीर्वाद,छत्रपतीची प्रेरणा आहे पाठी,
लढण्यास देई बळ चिमण पाखरांच्या भवितव्यासाठी... 

जरांगे पाटील अवलिया हा मोठा मुत्सद्दी, 
आरक्षणाचे निशाण रोवणार सरकार दरबारी,
न्याय मिळेपर्यंत योध्दा फिरणार नाही माघारी,
मनोज जरांगे पाटील योध्दा खरा मराठ्यांचा कैवारी... 

एक मराठा,लाख मराठा... 🚩👏

शब्दांकन:श्री.एस.डी.वायाळ.

©Siddheshwar Wayal
  #chaand
cd7863d84c74a2f35a30135ed4ad578a

Siddheshwar Wayal

स्वराज्य_जननी

१२ जानेवारी १५९८ दिनी सोनेरी पहाट झाली, 
जाधव कुटुंबात स्वराज्य जननी जन्मा आली, 
जिजाऊ नावाने मशाल पेटली नव क्रांतीची, 
स्वाभिमानी, स्वातंत्र्य प्रिय थोरवी रयतेच्या मातेची... 

राजनीतीची शिकवण घेऊन लखुजीराव जाधवांची,
मनात असे कनव सदा दु:खी पिडीत रयतेची, 
सुखी करण्या प्रजा केली तयारी संघर्षाची, 
स्वाभिमानी, स्वातंत्र्य प्रिय थोरवी रयतेच्या मातेची... 

जन्म देउन शिवबांना धन्य झाली महाराष्ट्रातीची माती, 
संस्काराचे बाळकडू देवूनी समजाविली सद्यस्थिती, 
स्वराज्य स्थापून शिवबां करवी,घडविली रयत क्रांती, 
स्वाभिमानी स्वातंत्र्य प्रिय थोरवी रयतेच्या मातेची... 

संकट काळात सावली झालात दोन्ही छत्रपतीची, 
सिध्देश काव्यमाळ गुंफतो थोर तेजस्वी माऊलीची, 
१७ जून १६७४ पोरकी झाली रयत ही खंत कायमची, 
स्वाभिमानी स्वातंत्र्य प्रिय थोरवी रयतेच्या मातेची... 

         जय जिजाऊ, जय शिवराय...🚩👏

                                                   ✍श्री.एस.डी.वायाळ.

©Siddheshwar Wayal #alone
cd7863d84c74a2f35a30135ed4ad578a

Siddheshwar Wayal

शंभूराजे

छत्रपती शिवबा सईराणीचा सुपुत्र शंभूराजे,
स्वराज्य रक्षक,निडर छावा शंभूराजे, 
जिजाऊंच्या छत्रछायेत घडलेला बाळ शंभूराजे, 
महाराष्ट्राचा पहिला परमप्रतापी युवराज शंभूराजे... 

युध्दधुरंदर अव्दितीय अजिंक्य योध्दा शंभूराजे, 
संस्कृतपंडित,शास्त्रवीर,धगधगता लाव्हा शंभूराजे, 
औरंगाजेबास जेरीस आणणारा छत्रपती शंभूराजे,
रयतेच्या मनावर राज्य करणारा  राजा शंभूराजे... 

कवी कलशाच्या मैत्रीतील गोडवा शंभूराजे,
गुलामीच्या श्रृंखला भेदणारा अंगार शंभूराजे, 
काळोखाच्या छाताडावर तेज पुंज इतिहास शंभूराजे, 
सिध्देश हर्षभरे अर्पितो शब्दपुष्प श्रीमंत शंभूराजे...

   🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे...👏

                                           ✍:-श्री.एस.डी.वायाळ.

©Siddheshwar Wayal #Journey
cd7863d84c74a2f35a30135ed4ad578a

Siddheshwar Wayal

लोकनायक
       
शिक्षणातून घडविला ज्यांनी  लोकमनात जागर,
महात्मा फुले होते जनकल्याणी लोकनायक...

सर्व साक्षी जगत्पती | त्याला नकोच मध्यस्थी ||, 
विचार वाणी त्यांची किती होती थोर,
सत्यशोधक चळवळीतून जनमानसात केले प्रबोधन,
महात्मा फुले होते जनकल्याणी लोकनायक...

महिला,अस्पृश्यांसाठी उघडलं शिक्षणाचं दारं,
सावित्रीमाईचा होता पाठीशी खंबीर आधार,
विचार क्रांतीची त्यांनी पेटविली  मशाल,
महात्मा फुले होते जनकल्याणी लोकनायक...

कष्टकरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जान ठेवून,
मांडली व्यथा 'शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथातून,
दिली उपाधी शिवरायांना कुळवाडी भूषण,
महात्मा फुले होते जनकल्याणी लोकनायक...

गुलामगिरी विरोधात केले वैचारिक बंड,
साहित्य लेखणीतून घडविला आयुष्यभर लोकजागर,
सिध्देशास अभिमानाने वाटे व्हावा ज्यांचा पाईक,
महात्मा फुले होते जनकल्याणी लोकनायक...

✍️:-श्री.एस.डी.वायाळ.

©Siddheshwar Wayal #VantinesDay
cd7863d84c74a2f35a30135ed4ad578a

Siddheshwar Wayal

सोहळा रंगाचा

रंग रंगात रंगून निघावा,
रंगाच्या या रंगपंचमीला,
रंग एक अंतरी असाही लावूया, 
माणसास माणूस जोडणारा...

काळा,पांढरा,हिरवा,पिवळा, 
भगवा,निळा,पोपटी,जाभळा, 
निर्मिती निसर्गाची रंग निरनिराळा, 
हर्षाने साजरा करुया रंगाचा सोहळा... 

समता,बंधुता,संदेश एकतेचा, 
एकमेकांच्या मनमंदिरी लावूया,
तिरंगा रंग हा राष्ट्राभक्तीचा, 
आपपल्या अंतरी प्रज्वलित ठेवूया... 

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी, 
देशाला सार्वभौम ठेवण्यासाठी, 
रंगाच्या या रंगपंचमीला, 
रंग एक अंतरी असाही लावूया... 

✍श्री.एस.डी.वायाळ.

©Siddheshwar Wayal #zindagikerang
cd7863d84c74a2f35a30135ed4ad578a

Siddheshwar Wayal

मायमराठी

मायबोली मराठीचा बोल,
जणू अमृताचीच खाण, 
संत,महतांच्या ग्रंथातून, 
उमटली पाऊलखुणाची साक्ष... 

संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, 
तुकोबांचे शब्दधन अभंगवाणी, 
नाथांचे भागवत,भारुडे,गौळणी, 
सांगे मायमराठीची थोरवी...

शब्द शब्द सह्याद्रीचा कणा,
मावळ्यांचा मराठी बाणा, 
शौर्याची अखंडित परंपरा, 
तलवार-लेखणी संघर्षाचा वारसा... 

भाषा रांगडी सानथोरांची,
संत,महत,छत्रपती,शाहीरांची, 
लेखक,कवी,पत्रकारांची,
देई शिकवण विश्वबंधुत्वाची...

काव्य,कथा,कांदबऱ्या दीपस्तंभ,
प्रेरणादायी जीवनाचा देई मूलमंत्र, 
समृध्द जीवन जगावे आयटीत,
सिध्देश सदभावे वंदीतो मायमराठीस... 

✍श्री.एस.डी.वायाळ.

©Siddheshwar Wayal
cd7863d84c74a2f35a30135ed4ad578a

Siddheshwar Wayal

श्री राजा शिवछत्रपती

बलशाली गडकोटांची महाराष्ट्राची संस्कृती,
वारसा शौर्याचा श्री राजा शिवछत्रपती...

बाळ शिवबा जन्मले किल्ले शिवनेरी,
जिजाऊंच्या संस्कारांची पाठी शिदोरी,
रयतकल्यणा घेतली तलवार हाती,
कुळवाडी भूषण श्री राजा शिवछत्रपती...

स्वकर्तृत्वाने पेटविली मशाल क्रांतीची,
जिंकून तोरणा केली पायाभरणी स्वराज्यांची, 
जिगरबाज मावळे होते सदैव सोबती,
स्वराज्य संस्थापक श्री राजा शिवछत्रपती...

किल्ले प्रतापगडावर खानाला धूळ चारली,
महाराजांसाठी बाजींनी प्राणाची बाजी लावली,
लाल महालात शायिस्ताखानाची बोटे उडविली,
गनिमांचा कर्दनकाळ श्री राजा शिवछत्रपती...

स्वराज्य बळकटीसाठी केली सुरतेवर स्वारी,
आग्रा कैदेत दिल्या औरंगजेबाच्या हाती तुरी,
शक्ती युक्तीने केली गनिमांवर चढाई,
क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती... 

सिध्देश हर्षाने सांगतो महाराजांची किर्ती,
रयतेचा कोहिनूर हिरा श्री राजा शिवछत्रपती...

🚩जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे👏

✍️शब्दांकन:-श्री.एस.डी.वायाळ.

©Siddheshwar Wayal #Goodevening
cd7863d84c74a2f35a30135ed4ad578a

Siddheshwar Wayal

🚩शिवशाही👏

शिवबा झुंजला झिंजलात तेव्हा तुम्ही, 
म्हणूनच मोकळा श्वास घेत आहोत आम्ही... 

दाहिदिशा दरवळते तुमचीच किर्ती, 
शौर्य,धैर्य,पराक्रमाची देई आम्हा स्फूर्ती, 
माॅंसाहेबांच्या विचारांनी घडविली क्रांती, 
स्वराज्य तेजाने सुखावली प्रजा आणि माती...

गनीमी कावा मावळ्यांची लढाऊ नीती, 
भल्या भल्या गनिमाना पाजले पाणी, 
किल्ले-किल्ले जिंकून अनेक बलशाली,
दिमाखात उभारल्या स्वराज्याच्या भींती... 

शिवराज्याभिषेक संपन्न झाला किल्ले रायगडी, 
जगाच्या नकाशावर प्रकर्षाने स्थिरावली शिवशाही, 
वारसा संघर्षाचा पेलला कायम माथी, 
सिध्देशाचा मुजरा छत्रपती शिवबांच्या चरणी...

जय जिजाऊ, जय शिवराय... 🚩👏
✍:-श्री.एस.डी.वायाळ.

©Siddheshwar Wayal #Goodevening
cd7863d84c74a2f35a30135ed4ad578a

Siddheshwar Wayal

प्रजासत्ताक दिन

सलाम राष्ट्रध्वज्याला,प्रणाम लोकशाहीला, 
प्रजासत्ताक दिन उत्सव आपला आला...||धृ||

देश माझा सारा आज एक झाला,
चिमुकल्यांचा चेहरा राष्ट्रप्रमाने फुलला,
वंदे मातरम्,भारत माता कि जय नारा, 
भारत मातेचा दाहिदिशा जयजयकार घुमला... 

राष्ट्रप्रेमाला आमच्या रंग आज चढला, 
धर्म सहिष्णुता मंत्र दिवसभर जोपासला, 
संविधानाचा अर्थ भाषण गीतातून समजला, 
राष्ट्रीय एकात्मतेचा महत्त्व कळाले सर्वाना... 

उद्या आहेच पुन्हा हाती वेगळा झेंडा, 
रंगा रंगात विभागला जातोय देश आपला, 
धर्मांध ठेकेदारांनी माणूस इथला पेटवला, 
देशापेक्षा ज्याला,त्याला धर्मच मोठा वाटायला... 

कसा होईल साक्षात्कार मग बलशाली राष्ट्राचा, 
कळणार कधी आपलीच माणसं आपल्याला, 
सीमेवर सैनिक आपल्यासाठी लढायला, 
राष्ट्रधर्माचा महान संदेश देतोय आपल्याला... 

सलाम राष्ट्रध्वज्याला,प्रणाम लोकशाहीला, 
प्रजासत्ताक दिन उत्सव आपला आला...

©Siddheshwar Wayal #soulmate
cd7863d84c74a2f35a30135ed4ad578a

Siddheshwar Wayal

महिला युगप्रवर्तक
                               
३ जानेवारी १८३१ ज्योत पेटली क्रांतीची,
जन्मा आली क्रांतीज्योती माई सावित्री,
खंडोजी पाटलांच्या संस्कारात वाढली, 
महिला युगप्रवर्तक ज्ञानज्योती सावित्री...

जिच्या हाती पाळण्याची दोरी, 
जगाती ती उध्दारी,
विचाराच्या कसोटीवर उतरली खरी,
महिला युगप्रवर्तक माता सावित्री...

खंबीर साथ होती पाठीशी ज्योतिबांची,
मुलीच्या शिक्षणाचा घेऊन ध्यास हाती,
नव्या युगाची लिहण्या नवी कहाणी,
महिला युगप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्री...

ज्योतिबांच्या जीवनरथाच्या झालीस सारथी,
बहुजनांसाठी शिक्षणाचे दारे त्यांनीच खोलली,
सत्यशोधक चळवळीची धूरा सांभाळली,
महिला युगप्रवर्तक सत्यवान सावित्री...

झिंजविला देह स्त्री जागृतीसाठी,
अंगावर झेलली दगड,शेण,माती,
पीडीतांच्या मदतीला धावली त्यागमूर्ती,
महिला युगप्रवर्तक माऊली सावित्री...

अज्ञानाचा अंधकार मिटवणारी पणती,
अखेरचा श्वासही वाहीला जनमाणसासाठी,
सिध्देशाचे शब्द अपुरे पडती, 
क्रांतीज्योती माई सावित्रीची सांगण्या थोरवी...

ज्योतिबांची स्वप्नपूर्ती करणारी अर्धांगिनी,
महिला युगप्रवर्तक माई सावित्री...

©Siddheshwar Wayal #zindagikerang
loader
Home
Explore
Events
Notification
Profile