Nojoto: Largest Storytelling Platform
gopichandsantosh6000
  • 4Stories
  • 21Followers
  • 17Love
    0Views

Gopichand Santoshkumar Sarwade

  • Popular
  • Latest
  • Video
f40afba97fc423165c8ddc4599ce00b0

Gopichand Santoshkumar Sarwade

हा, मी भिमाचा पँथर !
आदी मी, बाकीचे नंतर..! 

मी काळा स्वातंत्र्य दिवस, 
मी निवडणुकीचा बहिष्कार, 
मी काळा प्रजासत्ताक दिन, 
मी गीता दहनाचा अंधकार..! 

मी घमंडी पाटलाचा वैरी, 
मी पँथर ची एक पायरी, 
मी अन्यायविरुद्ध आवाज, 
मी न्याय देण्याची डायरी..! 

मी बाबासाहेबांचे साहीत्य, 
मी दलित जनता तमाम, 
मी दुश्मन हात-सेनेचा, 
मी भिमाकोरेगाव चा सलाम..! 

मी भिमाचा अभ्यासु, 
मी गवई बंधुंचे आस,
मी लव्हात्रे नी आठवले, 
मी दलितांचा विश्वास..!

मी विद्रोही नामदेव, 
मी पवारांचा जया, 
मी ढाले आणि महातेकर, 
मीच संगारेंचा भाया..! 

मी न्याय अन्यायातील अंतर, 
मी विद्यापीठाचे नामांतर.. 
म्हणुनच म्हणलं मी पँथर.. 
आदी मी बाकीचे नंतर..! 
                          -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #पँथर 
#Dalit_panther 
#Jay_Bhim
f40afba97fc423165c8ddc4599ce00b0

Gopichand Santoshkumar Sarwade

लढा.. 
आम्ही शांती सुखाने जगतो, 
तुम्ही का आम्हावर जळता? 
तुम्ही मागुन वार करुन पळता रे 
मागुन वार करुन पळता..!

                      आम्ही पेशवाई संपवुन विजयी, 
                          तेव्हापासुन आताही तुम्ही हारता..
                       कोरेगावात मागुन वार करता रे 
              तुम्ही मागुन वार करता..!

आम्हा एकट्यावर तुमचा झुंड, 
ना व्रुत्तपत्रात अन्यायी वारता..
तुम्ही नामर्द स्त्रियांना मारता रे 
आम्हाला लपुन दगड मारता..! 
    
                          विराज -अरविंद प्रकरणा नंतर,
                       राजग्रूहाची विटंबना करता..
                          तुमची लपुन मारायची परंपरा 
                         तुम्ही समोर यायला डरता..!

तुम्ही नाव घेता भलत्याच 
  सोयी  भिमाच नाव उदगरता..
               भिमानं दिलेल्या तुकड्यावर जगता रे.. 
         तुम्ही स्वत:चं नाव सांगाय घाबरता.. 

                  या आमच्याकडे लढा शिकायला.. 
                   भिडण्याचा Course लावण्यात येईल..
              अजुनही वेळ आहे सुधरा नाहीतर.. 
             तुम्हाला HORSE लावण्यात येईल...!
  
                                     -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #RAJGRUH
#jaybhim #लढा
f40afba97fc423165c8ddc4599ce00b0

Gopichand Santoshkumar Sarwade

"पँथर"

तत्व बुद्धाचे सवळ 
 क्रांतीसुर्याचा मार्ग दावला 
'दलित पँथर' च्या जमान्यात,
नव क्रांतीचा सुर्य घावला.. 

बुद्धाने जगा समतेचा
शांतीचा कर्म दिला 
भिमाच्या धार लेखनीने 
पँथरला जन्म दिला..! 

अन्यायविरुद्ध भिडला 
पँथर रसत्यावर लढला,
मनुवादी चिढला कारण 
त्याला पँथरने फोडला..! 

कायद्याने तो चालला 
प्रसंगी वैर घडले, 
जे पँथर ला नडले 
ते कायमचे आडवे पडले..!

वाट बघु नको भिमसैनिका 
आता,उद्या नी नंतरची.. 
मनुवाद्याला दाखव आता  
भिमशक्ती दलित पँथरची..!

हाती भिमाची लेखनी घे,
प्रसंगी दे तलवारीला धार.. 
'पँथर' आठवुन कायद्याने कर 
वैर्याच्या छातीवर वार...!
    
                                   -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #पँथर 
#दलित_पँथर #Dalit #Panther
f40afba97fc423165c8ddc4599ce00b0

Gopichand Santoshkumar Sarwade

ते कष्ट करत राहीले,
पोटात अन्न नसाताना उन्हात.. 
वैभव सारं आज तुमच्यामुळे.. 
तुमच्या आठवनीची दौलत मनात... 

भल्या पहाटे जाता कामाला,
घरी नको म्हणत भाकरीला.. 
माय ओरडता म्हणतो कसा :
"अगं, खाउ दे माझ्या लेकराला "

सदा मायेनं हात फिरवला,
जिव त्याचा लेकरावर.. 
पद-कद लहान ण माणुसकीत राजा 
घरी, समाजात आणि नौकरीवर.. 

माझे बाबा तर मोठे साहेब.. 
वरच्या औळ्या तर तात्यांच्या नावावर.. 
ज्यांच्यांमुळं आम्ही सुखानं जगतो.. 

बाबांची नौकरी ही तात्यांच्या जिवावर.. 
बाबांनीही तसं कष्ट केलं,
सर्व सुख आम्हाला दिले.. 
भासवली नाही कोणतीच कमी,
तात्यांच्या स्वप्न पुर्ण केले.. 

प्रणाम अशा सर्व पित्यांना,
सुख आपल्याला मिळवुन दिले.. 
पण प्रथम मुख नाव त्यांचच.. 
जे आपल्याला माणुस करुन गेले ...
                   
                  -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #FathersDay


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile