Find the Latest Status about फुलांची शेती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांची शेती.
Shankar kamble
🌾 *सुगी...* 🌾 *सुगी सराईचं दिस* *नाही इसावा पायाला* *माय माळ तुडविते* *चार मोत्याच्या दाण्याला...* *भर उन्हाचा काहूर* *भिजं घामानं पदर* *आग पोटात पेटली* *चिल्या-पिल्याचा इचार...* *धाटं-धाटं जमवूनी* *भारा जोंधळ्याचा डोई* *लयी तापली ढेकळं* *भार संसाराचा वाही...* *काट्या-कुट्यात चालता* *देह -मनाला जखमां* *घाली फुंकर स्वतःच* *चिंधी बांधते त्या कर्मा* ... *अंग मोडूनियां काम* *नाही घडीचा आराम* *वात तीळ तीळ जळे* *दिव्यासंग ज्योत ठाम...* *घोट पिऊनिया पाणी* *दूर सारते भुकेला* *शिळ्या तुकड्या संगती* *पचविते नशिबाला...* *सांज ढळता-ढळता* **रास सरली-सरली *ऊत आला तुझ्या दारी* *झोळी अर्धी भरली...* *मोती झोळीत की डोळा* *दोन्ही नाहीत येगळा घास भरविते माय सारा अमृत सोहळा ©Shankar kamble #सुगीचे #रास #शेती #🎑शेती #शिवारात #Morning
Shankar kamble
सुगी सराईचं दिस नाही इसावा पायाला माय माळ तुडविते चार मोत्याच्या दाण्याला.. भर उन्हाचा काहूर भिजं घामानं पदर आग पोटात पेटली चिल्या-पिल्याचा इचार... धाटं-धाटं जमवूनी भारा जोंधळ्याचा डोई लयी तापली ढेकळं भार संसाराचा वाही... काट्या-कुट्यात चालता देह -मनाला जखमां* *घाली फुंकर स्वतःच चिंधी बांधते त्या कर्मा* ... अंग मोडूनियां काम नाही घडीचा आराम* वात तीळ तीळ जळे दिव्यासंग ज्योत ठाम...* *घोट पिऊनिया पाणी दूर सारते भुकेला* शिळ्या तुकड्या संगती पचविते नशिबाला...* सांज ढळता-ढळता रास सरली-सरली* ऊत आला तुझ्या दारी झोळी अर्धी भरली...* मोती झोळीत की डोळा दोन्ही नाहीत येगळा* * घास भरविते माय सारा अमृत सोहळा...* ©Shankar kamble #सुगीचे #रास #शेतकरी #🎑शेती #शेती #SunSet
Rohini kadam
सुखावलं असं डोळं, गहिवरली ही वाणी, सोनं पिकलं मातीत, झाली झाली आबादानी! #शेती #ओवी
vishnu thore
लाज फ़ुलांची विकली कोणी माळल्यावर सुकली वेणी पेरुन झाले वावर सारे अन पावसाला मुकली बेणी अजाणतेचा गर्भ जळाला थुंक विड्याची थुंकली कोणी वांझपणाचे जगणे झाले असली काही नकली कोणी -विष्णू थोरे ,चांदवड . लाज फुलांची विकली कोणी..
लाज फुलांची विकली कोणी..
read more