Find the Latest Status about मनाला विसावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाला विसावा.
रिया रूपेश पवार महाळुंगेकर
आयुष्याच्या या वळणावर ,, मिळावा थोडा विसावा ,, भक्कम तुझ्या खांद्यावर ,, आधार मला दिसावा... विसावा.. ❤
विसावा.. ❤
read moreSP
विसावा विसावा शोधीत फिरत होतो वन वन या परी, माहित नव्हती कुठ भेटेल सुखाची घागरी... भुलविनाऱ्या वाटा या चालत होतो जरी, अडथळांच्या लाटा तुडवीत चढत होतो पायरी... वाऱ्यासारखी धावत होती वेळ ही बावरी, ढगां आड लपून दाखवत होती काळ ती खरी... उंच भरारी आकाशी घेऊन शोधत होतो जरी, थकले सारे मन हे माझे ना ना प्रयत्न करी... डोळे निपता जाणवत होती मनाची अंधारी, हुरहुर सारी विचारीत होती लागेल का किनारी... शोधीताही सापडत नव्हता विसावा हा खरा, आता मनासही वाटू लागले किलबिल हाच बरा... चुकले माझे शोधत होतो ना ना या परी, खरा विसावा मनात होता पांडुरंगाच्या दारी... विसावा शोधीत फिरत होतो वन वन या परी, माहीत नव्हती कुठ भेटेल सुखाची घागरी... ©SP #विसावा #visava #serching for inner peace #marathi #MarathiKavita #poem
Nitin Thorat
नकळत तुझा होताना कधी तुझ्यात गुंतलो मलाच कळले नाही.वेडी आस ही तुझी सखे शब्दांचा संग आपलेपणाच अस काही नाही कवी नितीन थोरात ©Nitin Thorat नकळत मनाला #Morning
नकळत मनाला #Morning
read moreAmol Baviskar
तुझ्या रे मनाला ओढ लागलेली.. अशा सांग राती, किती जागलेली ... भरल्या काजळाचे, खुले रे खुले रे.. का सखे? काळजाची गति वाढलेली ? @ओम (प्रो अमोल जगदिश बाविस्कर) तुझ्या रे मनाला...
तुझ्या रे मनाला...
read moreAnita Gujar
🙏वेड्या मनाला कळावे🙏 देवाजीच्या देव्हाऱ्यात दिव्यापरी मी जळावे भक्तीतच दडे मुक्ती वेड्या मनाला कळावे ||१|| मार्ग शोधता सुखाचा वाट माझीच चुकली मोह मायेत फसलो संधी सोन्याची हुकली ||२|| ज्याने दिले सर्व काही नाव त्याचे ओठी नाही अश्रू दाटले लोचनी ठेचाळलो ठायी ठायी ||३|| आतातरी पाय माझे आज मंदिरी वळावे त्याच्या कृपेनेच सारे आता ग्रहण टळावे ||४|| लाभलेल्या या जन्माचे देवा सार्थकच व्हावे सेवाव्रत अर्पिताना माझे प्राण कामी यावे ||५|| सौ.अनिता गुजर ©Anita Gujar वेड्या मनाला कळावे #alonesoul
वेड्या मनाला कळावे #alonesoul
read moreRJ कैलास नाईक
मैत्री सुखद क्षणांचा हक्काचा विसावा मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा कैलास मैत्री #सुखद क्षणांचा हक्काचा विसावा मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा कैलास
मैत्री #सुखद क्षणांचा हक्काचा विसावा मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा कैलास
read morevaishali
🌷 तुझा सहारा मनाला 🌷 तुटलेल्या जीवनी या तुझा सहारा मनाला जगण्याची नवी दिशा दाखविली तूच मला खूप आधार वाटतो साथ तुझी असताना वाटे एकटे मज तू आसपास नसताना आयुष्यभराची साथ तुझी हवी आहे मला जाऊ नकोस सोडूनि कधी असे एकटीला तुझ्यामुळे आहे माझ्या आयुष्याला रे किंमत तुझा सहारा मनाला देई जगण्या हिम्मत सागराची मी लहर तूच आहेस किनारा तूच आता आहे माझ्या जगण्याचा रे सहारा तुझे माझ्यावरचे हे प्रेम आहे रे निस्वार्थ तुझ्याविना माझे जणू जगणेच आहे व्यर्थ तुझा सहारा मनाला ( अष्टाक्षरी काव्य)
तुझा सहारा मनाला ( अष्टाक्षरी काव्य)
read more