Nojoto: Largest Storytelling Platform

New कळले तुला काही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कळले तुला काही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळले तुला काही.

Stories related to कळले तुला काही

    LatestPopularVideo

Ashlesh Made

तुला खुप काही सांगायच होतं..

read more

vishnu thore

कळले आता गुज सारे.....

read more
कळले आता गुज सारे यौवनाचे
आरशाला नाव देवू मी पणाचे
भाकरीचा प्रश्न येता ऐरणीला 
मी कसा संकेत पाळू भाळण्याचे
- विष्णू थोरे कळले आता गुज सारे.....

Someshwar D

एवढंच मला कळले होते... #Shayari

read more
माणसांच्या गर्दीत राहून 
एवढेच मला कळले होते
माणुसकीचा रंग सोडून 
सारे बेरंगानेच मळले होते
सोमेश्वर एवढंच मला कळले होते...

Pratik Chaudhari

आपल्याला काय कळले ,नक्कीच कळवा #Poetry

read more
 आपल्याला काय कळले ,नक्कीच कळवा

Vinod Umratkar

असेच काही आठवले #yqtaai #yqmarathi #marathiquotes #bestyqmarathiquotes सखे,जेव्हा कधी तुला खूप कंटाळवाणे आणि नीरस वाटेल। तेव्हा फक्त एक क

read more
सखे,जेव्हा कधी तुला 
खूप कंटाळवाणे आणि नीरस वाटेल।
तेव्हा फक्त एक कॉल करून,माझ्याशी बोल
मी असा काही बोलेल,की तुला खूप बरे वाटेल। असेच काही आठवले
#yqtaai #yqmarathi 
#marathiquotes #bestyqmarathiquotes 
सखे,जेव्हा कधी तुला 
खूप कंटाळवाणे आणि नीरस वाटेल।
तेव्हा फक्त एक क

sagar alhat

तुला

read more

Vin's Bansode

#काही काही आयुष्य #poem

read more
भुरकट झाले आयुष्य असेच काही
शब्दात मांडले मी असेच काही
असे लिहलेले मी थोडे काही
आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य

Archana Deshpande-Pol

#काही तुझे काही माझे..

read more
काही माझे काही तुझे
क्षण वेचलेले ओले..
किती फुलले सुकले.
किती मनात मिटले.

तुझ्या मधाळ मीठीत
मोहरले मन धुंद
किती आठवावे गंध..
खुणा राहिल्या अभंग.

चंद्र व्याकुळला आता..
झुले नभाच्या कुशीत..
कसे आवरावे घन..
क्षण ओलावले आत.

आत धुमारे धुमारे..
मन असे बावरले..
माझ्या अबोल झाडाला..
लगडली लक्ष फुले.

फुले गंधाळ गंधाळ..
किती वेचावी ओटीत..
अंगणात, परसात..
बहर रूळतो मनात..

©अर्चू.. #काही तुझे काही माझे..

प्रेमाची_पहाट🦋

#काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

read more
❤
त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली 
बरचं काही घडलयं, 
तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात 
खूप काही बिघडलयं. #काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

पद्मवैखरी

तुला हारतांना... #Shayari

read more
तुला हारतांना...

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजावीता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार 
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या 
खेळास संपवेल मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

रोजची नवे ते बहाने हे 
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे 
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर 
नाही वळणार मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

किती आणखी मि या 
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच 
सोबती मलाच आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच 
नाही करवत राहण्याची 
दोन्ही सोडविताना मीच 
हरले त्यातही अशी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

©पद्मवैखरी तुला हारतांना...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile