Find the Latest Status about अनपेक्षित मराठी मूवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनपेक्षित मराठी मूवी.
Rutuja kalkate
गुलाबासारखी टवटवीत मोगऱ्यासारखी गोजिरी लाजाळू सारखी लाजिरी स्वतःच्याच विचारात रमलेली ती...! त्या प्रेमदिनी साहजिकच तिच्याही मनी डवरली असंख्य गुलाबफुले... आणि त्याच्याच कोवळ्या पाकळ्या मनपटलावर पखरत ती पुढेपुढे चालली होती तिच्या अंतर्मनात कल्पिलेल्या प्रतिमेने समोर यावे असे तिला वाटले... आणि काय आश्चर्य! त्या पाकळ्यांच्या पायघड्यांवरून तो खरोखरच समोर आला आणि तिच्या मनातला मोरपिसांचा फुलोरा आणखीनच फुलला अनपेक्षितपणे त्याला समोर पाहून वेंधळ्या मनाचा ठाव लागेनासा झाला... तिच्या मनातल्या गुलाबाच्या त्या पाकळ्या क्षणभर गोड लाजल्या... आणि तो जवळ येताच मनी बहरलेला गेंदेदार गुलाब ... जरा अस्वस्थही झाला त्याने मधाळ नजरेने तिच्याकडे पाहिले... तेव्हा तिच्या चेहऱ्यावर गुलाबी स्मितहास्य उमटले गुलाबांचा बगीचाच जणू दोघांच्याही मनी मोहरला तिचा हात हातात घेऊन तिला propose करण्यासाठी तो वाकला ज्या क्षणाची आस इतकी वर्षे लागलेली तो तिच्या मनीचा सोहळा साजरा होताना तिने पहिला त्याला चेहरा नसला तरी तिला माहित होत की तिच्या स्वप्नातला राजकुमारच प्रत्यक्षात समोर होता तिच्या प्रांजळ प्रेमाचा तो खराखुरा साक्षात्कार होता! . . . रोजच्या प्रमाणे पूर्व क्षितिजावर सूर्य उगवण्यासाठी तयार होता... आईची हाक कानावर पडली.... मनपटलावर सजलेला कोवळा ऋतू पुन्हा एकदा स्वप्नातच कुठेतरी विरून गेला त्याचा चेहरा आठवायचा प्रयत्नही तिने केला पण छे! त्याला कुठे चेहरा होता तो तर फक्त नेहमीप्रमाणे तिच्या स्वप्नातला एक सुखद आभास होता या स्वप्नाचे कधी विस्मरण न व्हावे म्हणून स्वतःच्या प्रतिभेला मोहोर आणावा अशी जाणीव तिला होऊ लागली व तिने कागदावर पुन्हा नव्याने प्रेमकाव्याचे शब्द उमटवून मुक्तछन्दातली कविता साकारली #Rutuwrites❤️ अनपेक्षित स्वप्न...
अनपेक्षित स्वप्न... #RutuWrites❤️
read moreअमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी