Find the Best देन_कुणाची_आहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
संतोष विजय उईके
बाप पोळला उन्हात अन्.. विस्तवामध्ये आई आपसूक हे दिवस सुखाचे.. बाळा आले नाही... माती, गोटा, रान तुडवली.. तुला शिकवण्या शाळा बदल्यात तिच्या हाती दिलास.. तू भिक्षेची झोळी... मान, सन्मान, ऐश्वर्य सांग.. देन कुणाची आहे कोण राबले, दुःख भोगले,...चिमण्या पोरांसाठी चंद्र तारे प्रेमावर तू.. खूप लिहितोस हल्ली आई बाबावर लिहितांना.. कशी आटते शाई.. सोना, चांदी, पैसा-अडका... काही मागत नाही जगणे त्यांचे तुझ्याचसाठी,..मरणही तुझ्यासाठी.. म्हातारपणी घास तरी तू... भरवलास का त्यांना श्राद्धामधली खीर पुरी ती,.. अता काय कामाची.. अनाथास तू आईबाबा.. काय असतात विचार बोल ऐकून येते मग बघ.. कसे डोळ्यात पाणी जगात नसेल तुझ्याहून तर.. दुजा कफल्लक कोणी आईबाबा कळले नाही... कळली नाही महती... ©संतोष विजय उईके #देन_कुणाची_आहे....
#देन_कुणाची_आहे.... #मराठीशायरी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited