Find the Best माझेकुटुंब Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
मी,माझी आई,सौभाग्यवती,दोन मुली.इतकेच माझे कुटुंब प्रेमाचे प्रतिबिंब आई माझी घर सांभाळते,अजूनही तिच्याच हातात व्यवहाराची धुरा असते. सौभाग्यवती मुलींची घेते काळजी,नि तिच्याच अंगावर अभ्यासाची जबाबदारी. दोन मुली दोन्ही खूपच हुशार,छोटी खूप अतरंगी, सतत मस्ती करणार आणि मोठी मात्र नेहमीच शांत राहणार. वडील गेल्यानंतर मीच कुटुंब प्रमुख नेहमीच तटस्थ राहतो, कुटुंबातील प्रत्येकाची बाजू व्यवस्थित धरून ठेवतो माझे विश्व म्हणजे माझे कुटुंब इथे नेहमीच आनंद असतो, कधीच कुणाच्याही मनात राग रुसवा नसतो. कितीही दुःख आले जीवनात तरी चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो. राहतो आम्ही सर्व एकत्र प्रत्येकास सांभाळून घेत असतो, माझे कुटुंब प्रेमाचे प्रतिबिंब इतकेच आम्ही जाणतो. नमस्कार मित्रहो आज जागतिक कुटुंब दिन आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडुन कुटुंब दिनाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात. त्यानिमित्त आताचा विषय आहे माझे कुटुंब प्रेमाचे प्रतिबिंब.. #माझेकुटुंब हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
नमस्कार मित्रहो आज जागतिक कुटुंब दिन आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडुन कुटुंब दिनाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात. त्यानिमित्त आताचा विषय आहे माझे कुटुंब प्रेमाचे प्रतिबिंब.. #माझेकुटुंब हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited