Find the Best देह_मातीचा_गाडगा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
#देह मातीचा रे गाडगा देह मातीचा रे गाडगा तो मातीतंच जाणार मातीतुनी जन्मा आला त्याचा मातीतंच तयाचा अंत हा होणार तुझ्या माझ्या देहाची सारखीच माती जग कुंभाराचे चाक ते नित्य फिरे गरगर देव कुंभार रे नेक सदा सत्वपरिक्षा तो घेत राहणार देवासाठी असे साऱ्या विश्वाचे अंगण देव कारागीर मोठा राशीवर रास चढवी नसे कामाला रे तोटा आधी माती सडवितो जळमाजि कालवितो गर्भकोश रे मातेचा मगआवा बनुनीया जातो नऊ दिस नऊ मास दैवचक्र वेगे दौडत राही देवाची बोटं लीलया फिरती गोळा आकारास येई प्राण फुंकर मारतो अग्निमाजि तापवितो भट्टी अचुक जमता गडु आकार हा घेई किती गाडगी मडकी नाना परी नाना अस्तित्वे घेऊनीया भाग्य येती त्यांची नानाविध रूपे ललाटीचा भोग ज्याचा त्याचा असे जैसा तैसा होत असे प्रत्येकाचा संचार तैसा दैवगती ना कधी कळते ना कळली इथं कुणास दैवत्वासमोर या जगीचे असे सर्वच लाचार जन्मा येई कुणी घेऊनी हंडा मोतीयांचा तर कुणी होई धनी सदा भडाग्नीचा कुणा मिळे शितलता तर कुणाच्या वाट्याला येई विस्तवाच्या खाणी जे काय पडले पदरी तयाचा करूनीया स्विकार कर्मबंधाची ही शिदोरी ज्याची त्याची ज्याला त्याला न्यावी लागेल अंती पार नको हुरळुन जाऊ नको करू हा फुकाचा रे माज तुझा जन्म असे मातीचे मडके तयाचा शेवटही असे मातीचेच खापर जन्ममरणाचा हा अनोखा प्रवास चालतसे सदा मातीतुन मातीकडे वृथा मोह वृथा देह सांभाळी सारेच जन सदा इथं असे सारेच रे जगण्यासाठीच रे वेडे देह मातीचा रे गाडगा तो मातीतंच जाणार मातीतुनी जन्म झाला त्याचा मातीतंच तयाचा अंत हा होणार @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #देह_मातीचा_गाडगा
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited