Nojoto: Largest Storytelling Platform

Best stopsmearingcakes Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best stopsmearingcakes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

rayansh

डोळ्यांत माझ्या रोज येतं पाणी
काय सांगू रोज एकेक किस्सा अलग कहानी
दिसतं सगळं साफ साफ
देवा मला कर माफ

कुणी बर्थडे करतंय केक फासून
कुणी घास शोधतंय कचरा तासून
कुठं फेकाफेकी अन्नाची
कुठं खळगी शेकी पोटाची
कुणी खाऊन खाऊन करतंय माज
कुणी उरल्यासुरल्यात भागवतंय आज
देवा तुझ्याही पारड्याचं झुकतंच माप
देवा......

कुणाच्या जिव्हेचे नाना चोचले
कुण्या जिभेला दाणापाणी ना पोहोचले
कसल्या जीवावर असे नखरे
भुकेल्या सजीवांवर कसे निखारे
काय सांगू कशा कुणाच्या तऱ्हा
कसं पाहु खळगी भरणारा कचरा
सारं सारं काही दिसतं साफ अन उडवतं थरकाप
देवा......

कुणाला नशिबानं मिळालेल्या गृहसौख्याचा आलाय वीट
कुठं घरं गाठायला गरिबांची पायपीट
कुणी हर सुखात धनी आशा खोटी दाखवतोय
कुणी भर उन्हात अनवाणी अनुश्या पोटी चालतोय
कुणी बेफिकीर हौस पुरवतोय हट्टाची
कुणाला चिंता चितेच्या लाकडांची
शेवटचा प्रवास मात्र एकसारखाच वैकुंठा उःशाप 
देवा..... #rayofhope #respectfood #stopsmearingcakes #poverty #humanity #humanbeing


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile