Nojoto: Largest Storytelling Platform

नामकरण घरामध्ये आनंदाची उधळण झाली, १५ ऑगस्टल

नामकरण

घरामध्ये आनंदाची उधळण झाली,
     १५ ऑगस्टला घरामध्ये लक्ष्मी आली...
बघुनी तिचे सुंदर रूप,
   घरामध्ये सर्वांना आनंद झाला खूप...

पहिल्यांदा बघतांना तिला,
आईच्या डोळ्यात आले पाणी..
कुशीत घेऊन तिचे बाबा म्हणाले,
किती सुंदर आहे माझी राणी...

सजवला गेला पाळणा आज,
नटल्या सर्वजणी......
काय नाव ठेवायचे बाळाचे,
विचार करत होत्या सर्व मनी...

बनऊनी घुघऱ्या आज,
पळण्याखली ठेवण्यात आल्या वाट्या..
नाव ठेवायला बाळाचे आता,
उठल्या तिच्या आत्या...

ठेऊनी बाळाचे छान नाव,
फुंकर मारली आत्याने बाळाच्या कानात..
ऐकुनी आपले छान नाव,
बाळपण हसले क्षणात....

आज बाळाला स्वतःचे असे नाव  मिळाले सुंदर
नामकरणाची विधी पूर्ण होताच, हसले  सर्वजण मणभर...

©Priyanka Jaiswal
  #नामकरण