Nojoto: Largest Storytelling Platform

देह दुःखाचा झाकून सदैव पांघरूण सुखाचे झाकत राहिला

देह दुःखाचा झाकून सदैव 
पांघरूण सुखाचे झाकत राहिला 
अनंत यातनांचे जरी उरात काटे 
तरीही बाप माझा मी हसताना पाहिला... 

होऊन आमचा आधारस्तंभ 
सर्वांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला 
हरला जरी कित्येकदा तो 
डोळ्यात मात्र त्याच्या थेंब नाही पाहिला... 

सोडून स्वतःची स्वप्ने वार्‍यावर 
आम्हासाठीच तो आजवर झिजत राहिला 
नाही सोडला त्याने संयम कधीच 
निःस्वार्थपणे तो जगताना मी पाहिला... 

गेला दूर जरी देहाने आमच्यापासून
तत्वनिष्ठेने तो हृदयात आमच्या राहिला 
जळला जरी तो सरणावर आज 
पाणी डोळ्यातले आमच्या पुसताना मी पाहिला...

©कविराज धनंजय
  #बाप
#कविराज_धनंजय 
#FathersDay