Nojoto: Largest Storytelling Platform

विठ्ठल विठ्ठल.. देह हा विठ्ठल सारे मनही विठ्ठल एक

विठ्ठल विठ्ठल..

देह हा विठ्ठल सारे मनही विठ्ठल
एक नाम ओठी विठ्ठल विठ्ठल..

चालता वारी अवघे आयुष्य रिंगण
टाळ मृदंग नाद बोले विठ्ठल विठ्ठल..

देहातल्या देही एक मुक्तीचा की पाठ 
अंत आरंभाची खूण जय विठ्ठल विठ्ठल..

पावलांना नित झाली की रे सवय
पायवाट गावोगाव जोड विठ्ठल विठ्ठल..

पंढरीच्या वाटे झाले हलके ओझे
गळाभेटी भक्तां भेटे विठ्ठल विठ्ठल..

©Dileep Bhope
  #विठ्ठलविठ्ठल