Nojoto: Largest Storytelling Platform

हाताचाच झोपाळा जीवाचा लाऊनिया लळा! पान्हा देते ऊस

हाताचाच झोपाळा 
जीवाचा लाऊनिया लळा!
पान्हा देते ऊस कामगार 
आपुल्या पोटच्या बाळा!!१॥

हातावर आणणे 
हातावरच हो आहे खाणे |
विधात्याने जन्म कामगाराचा दिला 
या जन्मालाच आहे गोड माणणे ||२||

ऊस गोड लागला 
म्हणून मुळासकट ना खाल्ला |
कष्टाचा संसार स्त्रीच्या जन्मी 
कष्ट करता करता मार्ग मिळाला ||३||

ऊस कापण्यात जन्म जगली
ऊसाची गोडी स्वभावात आणली |
नाही चाखाया कधी तोंडी लागला
तरी त्याची गोडी आचरणात वर्तवली|४||

उघड्यावर थाटला  संसार 
जिथे मिळे काम तिथे खाऊ घास चार|
भवसागर हा या जीवनी करु पार
नाही पाहु मागे, ना घेऊ माघार |५||


मोहन सोमलकर नागपुर 🙏🏻

©Mohan Somalkar
  #उस कामगार

#उस कामगार #मराठीकविता

127 Views