Nojoto: Largest Storytelling Platform
ashvinipatil3716
  • 18Stories
  • 14Followers
  • 161Love
    1.7KViews

Ashvini Patil

  • Popular
  • Latest
  • Video
522e9d8b90aac35495c15062e6808b5a

Ashvini Patil

आज पुन्हा काळीज थरथरले जरासे
पावसाच्या थेंबाने शहारले जरासे

व्याकूळ माझे गीत मनीचे गाऊ दे जरासे
आर्त तुझ्या आठवणीने थिजले जरासे

स्वप्न तुझे नित्यच माझ्या नयनी 
स्वप्न सत्यात उतरण्या निजले जरासे

©Ashvini Patil
  #Barsaat
522e9d8b90aac35495c15062e6808b5a

Ashvini Patil

White जीव जळतो आहे विरहात या 
हातात हात पुन्हा कशाला
वेड्याच त्या आणाभाका मग
आठवण्याचा तो परत गुन्हा कशाला
मनाचे दरवाजे ते डोळेच तर उघडतात
मनाला उगीच दोष देण्याचा बहाणा कशाला
तुझ्या आवाजातच बासुरीचे सप्त स्वर
बासुरी वाजवण्या मग गोकुळेचा कान्हा कशाला

©Ashvini Patil
  #sad_shayari
522e9d8b90aac35495c15062e6808b5a

Ashvini Patil

होऊन पाऊस तू ही कोसळ क्षणभर
तूशार्त कर या अवनिला
घेवून सरीच्या या  कवेत
भिजवून टाक तू रंध्रा रध्राला
संध्याकाळचा होऊन पाऊस तू 
सूर लाव तू या उदासल्या अंगणाला
तू आणि पाऊस ...साम्य दोघात फारसे
नकळत ओलचिंब करता या तनामनाला
तू आणि पाऊस...साम्य दोघात काहीसे
अवचित गाठून चिंब करता या व्याकूळ जीवाला

©Ashvini Patil #rain
522e9d8b90aac35495c15062e6808b5a

Ashvini Patil

White सोसून त्रास ,भोगून वनवास 
कुणीच नसतं आनंदी आईसारखं
नवजन्म देताना ही मरणाच्या दारातून 
परतताना कुणीच नसत समाधानी आईसारखं 
स्वार्थी जगात धोक्याशिवाय  काहीच मिळत नाही
मतलबी दुनियेत कुणीच नसतं विश्वासू आईसारखं
हिशोबी दुनियेत फायद्यासाठीच असतात नाती
 घाट्याच्या व्यवहारात ही  कुणीच  नसतं दानशूर आईसारखं

©Ashvini Patil
  #mothers_day
522e9d8b90aac35495c15062e6808b5a

Ashvini Patil

आज पुन्हा पावसाच्या सरींनी मला भिजवलं
कोरड्या माझ्या मनाला ओलचिंब केलं
गडगडणारे ढग तुझी आठवण घेवून च आले
एकटीला मला गाठून सरींनी चिंब चिंब केलं
तुझ्यासारखा च पाऊसही रुसला आहे
आठवाणीं  मग पावसात डोळ्यांनाही ओलचिंब केलं
तुझ्याविना व्याकूळ, अतृप्त ,अपूर्ण मी
तुझ्यासारख च पावसाने नखशिखांत तृप्त तृप्त केलं

©Ashvini Patil
  #rain
522e9d8b90aac35495c15062e6808b5a

Ashvini Patil

sunset nature उदास या सांजवेळी मुक्या झाल्या भिंती
गर्दीत असणाऱ्या मनाला विरहाची भीती

ओघळणारे ते अश्रु दिसुच नयेत कोणा
ओठांना मग अश्रु लपवून हसण्याची सक्ती

होईल पहाट, जाईल तो अंधार दूर
डोळ्यांना ही त्या वेड्या आशेची आसक्ती

तुझ्या मोहात मी , तुझ्या बोलण्यात मी
मनात ही कुठली  तुझी आंधळी भक्ती

दहा खोट्यांमागे एक खरे लपावे
ही बोलण्याची जगाची कोणती उक्ती

नाराज मी,उदास मी  , सैरभैर मनाची वेदना
अलगद उतरती कागदावर व्याकूळ  त्या पंक्ती

गोड तुझ्या बोलण्यात विरघळली ही अशी काही'  मी
उरलीच आहे कुठे मी वेगळी व्यक्ती

©Ashvini Patil
  #sunsetnature
522e9d8b90aac35495c15062e6808b5a

Ashvini Patil

काश कोई दिल का दर्द खरिद लेता
बेचने को मेला, खरिदने को कोई नहीं होता
कितना भी किसी को अपना मानो
खुद के सिवा यहां कोई अपना नहीं होता
गुस्सा तो अपनो पर है आता
नादान दिल की बात यहाँ कोई नहीं जानता
चल पगले , अब संभल भी जा , हसी को गले लगा
रुठणे पर किसिको यहाँ कोई फर्क नहीं पडता

©Ashvini Patil
  #Problems
522e9d8b90aac35495c15062e6808b5a

Ashvini Patil

झूठ मूठ के वादो मे , फसना मेरी आदत नहीं
मेरी अहमियत पता है, खयालो मे , कभी मे उलझती नहीं
थोडा कम बोलती हूं, किये वादे कभी मे तोडती नहीं

स्वाभिमानी हुं, अहंकारी समझना नहीं
परिस्थितीयो से कभी हारी नहीं
दर्पण जैसा दिलं रखती हुं, झुठी अदाकारी नहीं

©Ashvini Patil
  #sadak
522e9d8b90aac35495c15062e6808b5a

Ashvini Patil

आज अचानक तुझी आठवण जागू लागली
मुद्दल बाकी ठेवून व्याजच मागू लागली

तुझ्या कर्जात पुरता मी बुडून गेलो तरी
तुला मिळवण्याची खटपट सुरू राहिली

©Ashvini Patil
  #alone
522e9d8b90aac35495c15062e6808b5a

Ashvini Patil





तू भेटलास त्या वनवासात ही 
सगळीकडेच प्रेम होत
माहीत नाही मला तुझ माझ्यावर 
कोणत्या जन्माच ऋण होत

©Ashvini Patil
  #ramsita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile