Nojoto: Largest Storytelling Platform
asj6456746298564
  • 61Stories
  • 47Followers
  • 734Love
    41.4KViews

Amita

poet

  • Popular
  • Latest
  • Video
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

White कैफियत राधेची.........

कान्हा रे कान्हा मी आले अवचित
अवतरले उतार वेळी तुझिया द्वारकेत

आगंतुक भासे जरी माझी भेट
निवडक प्रश्न काही विचारेन थेट...
प्रश्न विचारणे तर केवळ निमित्त..
मनी शेवटले कोरून घेण्याचे हट्ट...

यमुनेच्या किनारी, ते कोवळे मन
बागडले धुंद बावरी, तुझीच होऊन
आता तरी टिपूदे, तुला काही क्षण
आठवांची शिदोरी, मनसोक्त घेऊन....

कालिंदीच्या तटावरी, ते मंतरलेले दिन
कंकणांचे सूर, अन् पैजणांची किणकिण
वेणुचा आरव, अन कुंजवनी रासरिंगण
ओशाळून मी उभी, तुलाच लीन होऊन....

गोकुळ मागे सरले, मीही माझी न उरले 
थकली सारी गात्रे, अन दिवसही ओसरले 
शेवटली भेट तुझी, घ्यावी असे  ठरविले
परी बळ सारे देहाचे, हृदयी मी एकवटले....

भेटलास आज जेव्हा, बासुरी नव्हती
म्हटलास कसा, ती तुझीच खूण होती
पुन्हा कधी अधरी, वेणू विसावली नाही
जणू माझ्याचसाठी ती निनादली होती....

ही रात्र द्वारकेची, मनी भावनांचे उमाळे
भेटीस येऊदे परी, माझे  गोकुळ पुराणे
बोलुदे आता मज, मनसोक्त भरभरून
घेउदे मज एकदा, कृष्ण शेला पांघरून

बघ उत्तररात्र सजली, उरले किती क्षण
तुझा वियोग श्रीहरी, या क्षणी अटळ 
हाची अंतिमक्षण, स्मरणात साठवून
मनी हीच खूण, आता जन्मभर जपेन....

हात सोडून कान्हा, गेलास तू निघून
नेत्रात आता तुझे, केवळ चित्र स्मरून
कधीच झाली केशवी, अंतर्बाह्य परिपूर्ण
तेवते श्रीराधा, तुझ्यात विलीन होऊन....

अमिता

©Amita
  #राधा   मराठी कविता

#राधा मराठी कविता #मराठीकविता

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

White मनात जपलेल्या खुणांची, साक्ष तू देशील का?
लपंडाव नको आता, साक्षात तू येशील का?

श्रावणी कोवळी उन्हे, मनी चित्र चांदणे, 
तुझी आठव सखे, रिमझिम पाऊस गाणे..

गुंतता सखे सांजेला, आळवतो गीतमंजिरी
तुझ्यात रमताना सुचे, काव्यमाला अंतरी..

सरतात कैक दिनरात्री, बहरही नित्य ओसरतो.
व्याकुळ मेघ नभातूनी, जीव ओसंडून बरसतो..

तुझी सय केवळ आता, उरी बाळगून वावरतो
मुक्या व्यथा अंतरात, अविरत  झुरत रहातो..

अमिता✍️

©Amita
  #मराठीप्रेम 
#मराठीकविता

मराठीप्रेम मराठीकविता

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

उधळलास पारिजात तू माझ्या अंगणी
फुले वेचिता टिपले मी चांदणे त्या क्षणी..

आताशा मी गाते केवळ प्राजक्ताची गाणी
आठवणींचा माग निव्वळ उरला ध्यानीमनी..

अमिता✍️

©Amita
  #पारिजात 
#मराठीकविता

पारिजात मराठीकविता

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

White पाऊस💦💦

उगाच रिते का मन हे आतुर
वर्षा आगमनाची लागे हुरहूर.....
पाऊस येता अवखळ, अल्लड
तृप्त झाले मन हे चंचल....

वलयांकित नक्षीच्या रेखा 
उमटून गेल्या जळात पळभर....
वृक्षवेलींवर पाचूंची उधळण
अन् इंद्रधनुचे त्यावर कोंदण....

बिंदू अनामिक बुजरे क्षणभर
प्रवाहात ओघळती
जळात उमटले गगनाचे प्रतिबिंब
धरेच्या मिलनासाठी....

उंच तरुवर भिजूनी पक्षी
निवांत क्षण वेचती....
मध्येच फडफड, भिरभिर करिती
थेंब शिंपण्यासाठी....

उभ्या उभ्या सरींचा जणू
आरव घुमतो कानी
सप्तसुरांची मैफल जमते
नक्षत्रांच्या अंगणी....

ओल्या ओल्या मातीचा
गंध भरतो अंतरी
जणू कोमेजल्या मनाला 
लाभावी संजीवनी....

उमलून येई भाव मनीचे
जलधारा पाहताक्षणी
उमटून जाती अविरत शब्दांचे
काव्य लेखणीतूनी
काव्य लेखणीतूनी।।

अमिता🖋️

©Amita
  #पाऊस
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

वाद-संवाद 

जिथे पेटतो वाद, तिथे संपतो संवाद
शब्दांची होते झुंज, टोकाचा होतो नाद....

अपेक्षांचा सलतो भार , आक्षेपांना येते उधाण
शब्दांनीच होतो वार, हरवतात मान- सन्मान....

अनावर अश्रूंचे निर्झर , स्त्रवतात पुन्हा झरझर
विरून जाता तो अंगार, मनावर फुंकर अलवार....

आयुष्याच्या सांजवेळी, गिळून टाक मीपण
मनात उरलेला संदेह , सोडवू प्रेमाने आपण....

अमिता✍️

©Amita
  #StandProud 
#मराठीकविता

StandProud मराठीकविता

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

घन दाटून यावे..

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
मनातील किल्मिष जसे ओघळावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
व्याकुळ मनाचे बांध फुटावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
ओशाळल्या धरेला बिलगून जावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
भान विसरुनी चिंब भिजून जावे....

घन दाटून यावे अन् बरसुनी जावे
सर्व पाशांतूनी  ऋणमुक्त व्हावे.....

अमिता🌸✍️

©Amita
  #rain 
#मराठीकविता

rain मराठीकविता

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

ग्रीष्म...

ग्रीष्माची साक्ष देतो, हा सूर्य तप्त होऊनी
वाराही तेव्हा रुसून बसतो, अज्ञात राहूनी....

किरणे प्रखरतात, धवल निळ्या नभातुनी
आतपाच्या रेषा तेव्हा, झेपावतात धरेवरी....

साध्वी मही सदैव, सामावून घेते ज्वाळा
वृक्षछायेत मिळतो, असीम शीत जिव्हाळा....

करपते काया,  स्वेद बिंदू स्त्रवतात
तृषार्त होता कंठ, ओंजळी पसरतात....

ग्रीष्म ऋतू हा असा, आगळा वेगळा
चटके सोसल्यावर, मग येतो पावसाळा....

अमिता✍️

©Amita
  #मराठीकविता 
#उन्हाळा
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

Village Life लेखणीतूनी ......

वाटे मजला सारखे, पुन्हा पुन्हा जगावे 
प्रेम करावे शब्दांवर, अन् सुरात गीत गावे....

खळखळ जळात, पावले उसळून घ्यावी
मंजुळ गाणी गळ्यात, प्रीतीची गावी....

व्योमात विहंगथवा, एकटक बघावा
मोगरा कधीतरी, केसात सजवावा....

आयुष्य इतुके सुंदर, डोळ्यात साठवावे
काव्यात मनीच्या, उत्स्फूर्त प्रकट व्हावे....

अमिता✍️

©Amita
  #marathi 
#MarathiKavita
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

गारवा..

शिशिरातील गुलाबी थंडी,
भर पहाटे कुशीत घेते..
स्वप्न सुखाच्या हिंदोळ्यावर 
झुलताना नीजेत जागते....

सलणारी नको ती थंडी 
हवी उबदार ऊन शेकोटी..
निवल्या काळोखी जाहली
मनी भावनांची दाटी....

सांजवेळी उभा गारठा 
थिजणाऱ्या अंधुक वाटा..
कंपणाऱ्या अंतरी तेव्हा
उसळे रोमांचित लाटा....

हवाहवासा वाटे गारवा
क्षणिक सुखाचा जसा गोडवा..
सख्याच्या मिठीत फुले चांदवा
प्रीतीचा उमले पारिजात हळवा....

अमिता..,✍🏻

©Amita
  #मराठीकविता

मराठीकविता

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

काजवा

कसे,कोठून आले दिवे, चमकून गेले झाड
शाळा जणू काजव्यांची, बघे चंद्र नभाआड 

क्षणभराचे आयुष्य,लखलखाट तो फार
लुकलुकतो चिमणा जीव, तेजाळतो अंधार

हलके हलके वाऱ्यावरती, सोनसळी धुमार
काजव्यांचा बहर, की सजला सृष्टीचा शृंगार 

अमिता✍️

©Amita
  #मराठीकविता

मराठीकविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile